हॉटेलमध्ये गेल्यावर एखाद्या वेटरने दिलेली सेवा पसंत पडल्यास त्याला टिप देऊन त्याचं कौतुक करण्याची पद्धत आता भारतामध्येही अनेक ठिकाणी पाहिली जाते. अनेकदा छोट्या छोट्या हॉटेल्समध्येही अगदी पाच रुपयांपासून टिप दिली जाते. मात्र अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथील एका व्यक्तीने वेटरला जवळजवळ १२ लाखांची टिप दिलीय.

सीएननने दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी दुपारच्या सुमारास एक ग्राहक न्यू हॅम्पशायरमधील लंडनडेअरी परिसरातील स्टम्बल इन बार अ‍ॅण्ड ग्रील्स या रेस्तराँ कम बारमध्ये आला. त्याने काही खाद्यपदार्थ मागवले. यात दोन हॉट डॉग, वेफर्स, कोक, बियर आणि टकीला शॉर्टचा समावेश होता. या व्यक्तीचं बिल ३७ डॉलर (भारतीय चलनानुसार २ हजार ७४७ रुपये) इतकं झालं. बील देण्याबरोबरच या व्यक्तीने तब्बल १६ हजार डॉलर्सची टिपही वेटरला दिली. १६ हजार डॉलर्स आंतरराष्ट्रीय चलनाच्या दरानुसार भारतीय चलनात ११ लाख ८८ हजार रुपये होतात. यासंदर्भात बोलताना बारचे मालक माईक झारील्ला यांनी, “सर्व पैसे एकाच वेळी खर्च करु नका,” असा सल्ला या ग्राहकाने बार टेंडरला दिल्याचं सांगितलं. या ग्राहकाने नक्की असं का म्हटलं हे आधी बार टेंडरला समजलं नाही. मात्र नंतर त्याने दोन हिंट दिल्यानंतर त्या महिला बार टेंडरने टिप म्हणून देण्यात आलेली रक्कम पाहिली आणि तिला धक्काच बसला.

नक्की पाहा फोटो >> कार्तिकी मराठीतील नेहा कक्कर तर मृण्मयीसहीत ‘पंचरत्ना’ची Over Acting झाली नकोशी; पाहा Viral Memes

“त्या बारटेंडरने टिपची रक्कम पाहिली आणि तिने ओह माय गॉड दि इस जस्ट क्रेझी, असं म्हणत डोक्याला हात लावला. त्या मुलीने या व्यक्तीचे आभार मानले आणि त्यानंतर या मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद मावेनासा झाला होता,” असं माईक यांनी सीएनएनशी बोलताना सांगितलं.

ही टिप १२ जून रोजी देण्यात आली होती. मात्र खरोखरच पैसे मिळतात की नाही याची खात्री करुन घेण्यासाठी माईकने २१ जूनपर्यंत यासंदर्भात काहीही भाष्य केलं नव्हतं. पैसे जमा झाल्यानंतर त्याने हा प्रसंग फेसबुकवर शेअर केला. ही टीप बारमधील सात कर्मचाऱ्यांना वाटून देण्यात आली. एवढी मोठी टिप ठेवल्यानंतर हा ग्राहक नियमितपणे येथे येऊ लागल्याचं माईक सांगतात. मी त्याच्या बाजूला जाऊन बसलो आणि त्याला विचारलं की खरोखर तुम्हाला एवढी टिप द्यायची आहे का?, आम्हाला ही रक्कम घेण्यात थोडा संकोच वाटतोय, असं सांगितल्याचं माईक म्हणाले. तुम्ही चूकून ही रक्कम लिहिली असेल तर आम्ही ती परत करायला तयार असल्याचं माईक यांनी सांगितलं असता त्या ग्राहकाने नाही ही रक्कम त्या बारटेंडर्सला वाटून द्यावी, अशी माझी इच्छा असल्याचं या ग्राहकाने माईकला सांगितलं.

नक्की पाहा फोटो >> लस At First Sight… ‘या’ फोटोवरुन नेटकऱ्यांमध्येच जुंपली; जाणून घ्या नक्की घडलंय काय?

या बारमधील अनेक बारटेंडर या सिंगल मदर असून शिफ्टमध्ये काम करणाऱ्या आठही बारटेंडर्सने ही रक्कम स्वयंपाक्यांसोबत वाटून घेण्याचा निर्णय घेतला. या पैशांमधून काही बारटेंडर्स या त्यांच्या मुलांना घेऊन पिकनिकला जाणार आहेत. विशेष म्हणजे माईकने यापैकी एक पैसाही घेतला नाही.