Viral Video : सोशल मीडियावर अनेक जण त्यांच्या लहान मुलांचे व्हिडीओ आवडीने शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली आणि वडीलामधील गोड संवाद दाखवला आहे. वडील मुलीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. वडील मुलीच्या नात्यात एक वेगळा बॉन्ड दिसून येतो. हाच हटके बॉन्ड तुम्हाला या व्हिडीओत सुद्धा दिसून येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकली तिच्यासमोर सोफ्यावर बसलेल्या वडिलांना म्हणते, “तुझं काही धडच नाही. लॅपटॉप इथे तिथे पाडता तुम्ही.” त्यावर वडील म्हणतात, “लॅपटॉप लागतो काम करायला.” त्यावर चिमुकली म्हणते, आता आईने सगळं भरून टाकलं”
त्यानंतर ती आत जाते आणि आईला सांगते, “बाबांच काही धडच नाही ते सगळं इथे तिथे पसरवून ठेवतात लॅपटॉप त्यांचा.” त्यावर आई विचारते, “काहीच जागेवर ठेवत नाही का” त्यावर चिमुकली नकारार्थी मान हलवते आणि म्हणते, “बॅगमध्ये काहीच ठेवत नाही. मी सगळं आवरते.” त्यानंतर ती पुन्हा बाबाजवळ जाते आणि म्हणते, “काय रे बाबा काय धडच नाही ठेवत तुम्ही. १ नंबर फुसकी बाबा आहेत. सगळं ड्रॉवरमध्ये का नाही ठेवलं. तसचं ठेवलंय तुम्ही.” त्यावर वडील म्हणतात “काय ठेवलंय मी?” त्यावर चिमुकली बोट दाखवून सांगते, “घड्याळ ब्रेसलेट, चेन अंगठी” पुढे चिमुकली म्हणते, “किती काम करू मी बाबा टाबा चाबा” वडील म्हणतात, “त्याला काय होते माझं काम करायला तुला काह प्रॉब्लेम आहे का?” त्यावर चिमुकली म्हणते, “हे काय बोलतात. बघ ना तू नुसते फुसके बाबा आहेत.”

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Viral video of two little girls getting fighting is going viral on social Media after shankarpalya funny video
आता गं बया! बोबड्या बोलात चिमुकलींचा एकमेकींसोबत जोरदार राडा; VIDEO पाहून पोट धरुन हसाल मंडळी
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

हेही वाचा : ‘सोनी कितनी सोनी आज तू लगती वे…’ गाण्यावर मुंबईतील रस्त्यावर परदेशातील तरुणांचा भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल

u

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : गिटार वाजवत मोठ्या भावाने गायले गाणे, छोट्याने किंचाळत…., इंडोनेशिअन भावाडांनी जिंकले नेटकऱ्यांचे मन, पाहा Viral Video

dreamgirl_shraavi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ज्यांनी अशी बाबांची शाळा घेतली आहे त्यांनी comment मध्ये सांगा तुमच्या आठवणी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कित्ती गोड बोलते फुसके बाबा, टाबा, चाबा” आणखी एका युजरने लिहिलेय, “बाबांची लाडू बाई वैतागली आहे” एक युजर लिहितो, “तिच्यामुळे घरात आनंदी वातावरण असणार नेहमी कारण बोलतेच इतकं गोड”