scorecardresearch

Premium

बापरे! कुत्र्याने चक्क तोंडात लपवले टोमॅटो, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

काही महिन्यांपूर्वी टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना टोमॅटो खरेदी करणे कठीण झाले होते. दरम्यान, सोशल मीडियावरही टोमॅटोवर अनेक मिम्स, व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यातलाच एक जुना व्हिडीओ आता पुन्हा चर्चेत आला आहे.

a dog hide Tomatoes
बापरे! कुत्र्याने चक्क तोंडात लपवले टोमॅटो, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल (Photo : Instagram)

Viral Video : सध्या टोमॅटो स्वस्त झाले आहेत, पण काही महिन्यांपूर्वी टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना टोमॅटो खरेदी करणे कठीण झाले होते. दरम्यान, सोशल मीडियावरही टोमॅटोवर अनेक मिम्स, व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यातलाच एक जुना व्हिडीओ आता पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडीओत कुत्र्याने चक्क टोमॅटो लपवलेले दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला कुत्रा निवांत झोपलेला दिसेल. पुढे व्हिडीओत दिसते की, एक महिला हळूहळू कुत्र्याच्या तोंडातून एक-एक टोमॅटो बाहेर काढताना दिसत आहे. सुरुवातीला कुत्र्याला पाहून कोणाला वाटणार नाही की कुत्र्याने १०-१५ टोमॅटो तोंडात लपवून ठेवले असतील, पण महिला एक-एक करून चक्क १०-१५ टोमॅटो कुत्र्याच्या तोंडातून बाहेर काढताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Noida Police Shares Video Of python rescue
धावत्या ट्रकच्या केबिनमध्ये शिरला भलामोठा अजगर, पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावला ड्रायव्हर, थरारक VIDEO पाहाच
passenger dancing in a train video went viral Northern Railway gave valuable advice
ट्रेनमध्ये डान्स करणाऱ्या प्रवाशाचा Video झाला व्हायरल; उत्तर रेल्वेने दिला मोलाचा सल्ला…
lalbagh raja celebs are getting vvip treatment common people are being mistreated
देवाच्या दारात भेदभाव? लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत सेलिब्रिटींना VVIP दर्शन अन् सामान्यांना धक्काबुक्की; Video Viral
A person uses a railway track to reach another platform and in the process his slipper falls off
लोकल ट्रेन समोरून येत असताना तो ट्रॅकवर चप्पल घालू लागला अन् क्षणात…VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

हेही वाचा : VIDEO : कलेला तोड नाही! तरुणाने चक्क गुळापासून रेखाटलं शिव-पार्वती आणि गणपती बाप्पाचं चित्र, व्हिडीओ एकदा पाहाच

vikramgoyal1997 या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “किती गोंडस चोर आहे… कृपया त्याला शिक्षा करू नका”; तर एका युजरने विचारले, “आता हे टोमॅटो तुम्ही वापरणार आहात की फेकून देणार?” आणखी एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “बापरे, कुत्र्याने तर कोटींचा माल लपवला होता…”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A dog hide tomatoes in mouth funny video goes viral on instagram social media pet video ndj

First published on: 21-09-2023 at 12:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×