scorecardresearch

Premium

यालाच खरं प्रेम म्हणतात… चक्क बस स्थानकावर येऊन कुत्रा मालकाची वाट बघतोय, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर मालकाबरोबर कुत्र्याची मैत्री दाखवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुत्रा चक्क बस स्थानकावर येऊन मालकाची वाट बघताना दिसत आहे.

a dog is waiting for owner to come home on bus stop video goes viral of pet lovers on instagram social media
यालाच खरं प्रेम म्हणतात… चक्क बस स्थानकावर येऊन कुत्रा मालकाची वाट बघतोय, पाहा व्हिडीओ (Photo : Instagram)

Viral Video : कुत्रा हा माणसाचा अतिशय जवळचा आणि प्रिय प्राणी मानला जातो. त्यामुळे अनेक जण आवडीने कुत्रा पाळतात. कुत्र्याला त्यांच्या घरच्या सदस्याप्रमाणे वागणूक देतात. कुत्रा हा प्रामाणिक असून मालकासाठी वाट्टेल ते करायला तयार असतो. सोशल मीडियावर मालकाबरोबर कुत्र्याची मैत्री दाखवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुत्रा चक्क बस स्थानकावर येऊन मालकाची वाट बघताना दिसत आहे.

मालक घरी येताच कुत्रा त्यांच्या अंगा खांद्यावर येतो, असे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर यापूर्वी पाहिले असतील पण या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की कुत्रा चक्क मालकाला घरी घेऊन जायला बस स्थानकावर आला आहे. मालकाची वाट बघत तो बस स्थानकावर उभा होता. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक बस येते. त्यातून एक एक प्रवासी खाली उतरतात. जेव्हा कुत्र्याची मालकीण खाली उतरते तेव्हा कुत्रा धावत तिच्याजवळ जातो.

video of family eating 3 course meal on train went viral
Viral video : पुलाव, पराठा, अन् लोणचं; रेल्वेमधील जेवणाचा राजेशाही थाट पाहून नेटकरी झाले थक्क! व्हिडिओ पाहून म्हणाले…
Mumbai Mira road attest viral video is fake
Fact check : मुंबई येथील मीरारोडचा व्हायरल होणारा ‘तो’ व्हिडीओ खरा की खोटा? काय आहे सत्य जाणून घ्या
friendship will never end an old man keep friendship video viral of farmers home friendship in old age
Video : ही दोस्ती तुटायची नाय! म्हातारपणातही आजोबा जपताहेत मैत्री, शेतकरी राजाच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
Blindfolded man identifies his wife by just touching her hand
याला म्हणतात खरं प्रेम! डोळ्यावर पट्टी बांधलेली असतानाही फक्त हाताला स्पर्श करताच ओळखलं बायकोला, व्हिडीओ होतोय व्हायरल

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तुम्ही प्राण्यांवर जितकं प्रेम कराल त्यापेक्षा सुद्धा जास्त प्रेम प्राणी आपल्यावर करतात.हे या व्हिडीओतून तुम्हाला दिसून येईल. काही लोकांना कुत्र्याचं प्रेम पाहून त्यांच्या कुत्र्याची आठवण येऊ शकते.

हेही वाचा : भर दिवसा कुत्र्याने त्याच्या मैत्रीणीला नेलं पळवून; मागे मालकीण पुढे कुत्रा, पाहा गमतीशीर VIDEO

lovedog.dodo या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माझा दिवस कितीही कठीण गेला असला तरी घरी आल्यावर कुत्र्याचे हलणारे शेपूट पाहून सर्वकाही चांगले होते”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “ही एक वेगळी भावना असते.”तर एका युजरने लिहिलेय, “खरं खरं प्रेम” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A dog is waiting for owner to come home on bus stop video goes viral of pet lovers on instagram social media ndj

First published on: 02-12-2023 at 09:49 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×