scorecardresearch

Emotional Video: पाच वर्षांपूर्वी चोरीला गेलेला कुत्र्याने मालकाला पाहिलं आणि…

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात पाळीव प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते.

Dog
Emotional Video: पाच वर्षांपूर्वी चोरीला गेलेला कुत्र्याने मालकाला पाहिलं आणि…

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात पाळीव प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. पाळीव प्राणी कुत्रा, मांजरींना घरातील सदस्य असल्यासारखी वागणूक कुटुंबीय देतात. त्यांना हवं नको त्याची काळजी घेतात. त्यामुळे पाळीव प्राण्यांचं आणि कुटुंबाचं जिव्हाळ्याचं नातं तयार झालेलं असतं. प्राण्यांना बरं नसलं की घरातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येते. मात्र इतकं प्रेम असलेला प्राणी जर कुणी चोरून नेला तर, विचार करा घरच्या सदस्यांना किती दु:ख होत असेल. असाच काही प्रसंग एका कुटुंबावर आला होता. लाडका कुत्रा कुणीतरी चोरून नेला. पण शोध घेऊनही सापडला नाही. मात्र अचानक पाच वर्षानंतर कुत्रा आणि मालकाची भेट झाली आणि भावना अनावर झाल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

द गुड न्यूज मूव्हमेंट या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यासोबत एक पोस्ट लिहित संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली आहे.. “कुत्रा आणि मालक पाच वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा भेटले. हा कुत्रा चोरीला गेला होता आणि कुटुंबाला वाटले की त्याची पुन्हा कधी भेट होणार नाही.” व्हायरल व्हिडीओत अनेक कुत्रे एका कंपाउंडच्या आत फिरताना दिसत आहे. काही क्षणातच दोन जण कंपाऊंडमध्ये येतात आणि एक कुत्रा त्यांच्याकडे धावत येतो. इतक्या वर्षांनंतर आपल्या माणसाला भेटल्याने कुत्रा आनंदाने उड्या मारतो आणि मालकही कुत्र्याला मिठी मारतो. क्लिपच्या शेवटी कुत्रा पाठीवर झोपून आनंदाने लोळताना दिसत आहे.

अप्रतिम व्हिडीओ काही दिवसांपूर्वी ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. शेअर केल्यापासून, व्हिडीओला ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि ही संख्या वाढत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला असून २०० हून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने लिहिले, “खूपच छान भेट झाली.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A dog that was stolen five years ago meets its owner emotional video rmt

ताज्या बातम्या