kerala Video Viral: सध्या संपूर्ण देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पूरजन्य परिस्थिती उद्भवली आहे; तसेच काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. पाच-सहा दिवसांपूर्वी अशीच एक संपूर्ण देशाला हादरवणारी दुर्घटना केरळमधील वायनाड येथे घडली. मुसळधार पावसामुळे वायनाड येथे भूस्खलन झाले. या भूस्खलनामुळे अनेक घरे, जीव ढिगार्याखाली अडकले. त्यात अनेक लोकांचा, पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला; तर काही लोक जखमी झाले आहेत. या भूस्खलनात ३८७ हून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला असून, अनेक जण अजूनही सापडलेले नाहीत. या दुर्घटनेने सगळीकडे हाहाकार माजला आहे. सध्या या दुर्घटनेसंबंधित आणखी एक काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून अनेक जण हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत. घरातील पाळीव प्राणी अनेकांसाठी घरातील इतर सदस्यांप्रमाणेच असतात. त्यांना घरातील इतरांप्रमाणेच वागणूक, प्रेम दिले जाते. श्वान, मांजरीचे असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. त्यात त्यांचे घरातील मालकांबरोबरचे बॉण्डिंग पाहायला मिळते. प्राण्यांना जरी आपल्यासारखे बोलता येत नसले तरीही त्यांच्या वागण्यातून ते भावना व्यक्त करताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून अनेक जण हळहळत आहेत. नक्की काय घडलंय व्हिडीओमध्ये? (kerala Video Viral) सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक श्वान ढिगाऱ्यात अडकल्याचे दिसत आहे; जो मदतीसाठी कळवळत आहे. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच एनडीआरएफचे जवान त्याला ढिगाऱ्यातून बाहेर काढतात. सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ वायनाड येथील असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, हा व्हिडीओ वायनाड येथे झालेल्या घटनेशी संबंधित नसून, तो २०२१ मध्ये केरळमधील पलक्कड येथे घडलेल्या दुर्घटनेचा आहे. त्यावेळी या श्वानासह ढिगाऱ्याखाली चार पिल्ले अडकली होती. हेही वाचा: “आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, ‘सुसेकी’ गाण्यावर भारतीय चिमुकलीने परदेशात केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक पाहा व्हिडीओ: हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @wayanadlandslide या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत १०दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स विविध प्रकारच्या कमेंट्स करताना दिसत आहेत. या कमेंट्समध्ये युजर्स हा व्हिडीओ केरळमधील जुन्या घडनेचा असल्याचा दावा करीत आहेत. दरम्यान, यापूर्वी सोशल मीडियावर वानयाडमधील श्वानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये पाच-सहा दिवसांनंतर मालकीण दिसल्यानंतर श्वानाने तिला मिठी मारली होती. हा व्हिडीओदेखील खूप चर्चेत होता.