scorecardresearch

Premium

Video: प्राणीप्रेमी! श्वान जोडप्याचे थाटामाटात केले ‘डोहाळजेवण’

एका कुटुंबानं श्वान जोडप्यासाठी डोहाळजेवण कार्यक्रमाचं आयोजन केले

A family has organized a baby shower for a dog couple
(सौजन्य:इन्स्टाग्राम/ @rosyremotheretriver) Video: प्राणीप्रेमी! श्वान जोडप्याचे थाटामाटात केले 'डोहाळजेवण'

Viral Video : प्राणीप्रेमी असणारे अनेक जण त्यांच्या आवडीनुसार घरात विविध प्राणी पाळतात. मांजर, कुत्रा, कासव, ससा आदी अनेक प्राण्यांना आवडीने घरी घेऊन येतात आणि त्यांची काळजी घेतात. घरात राहणारे पाळीव प्राणी कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच असतात. आतापर्यंत तुम्ही प्राण्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचं किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी त्यांना छान कपडे घालून तयार करण्यात आलेलं पाहिलं असेल. पण, आज सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडीओ पाहायला मिळाला आहे; ज्यात एका कुटुंबानं चक्क श्वान जोडप्यासाठी ‘डोहाळजेवण’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

पाळीव प्राण्याच्या पालकांनी या श्वान जोडप्याचं नाव रोझी आणि रेमो (Rosy & Remo ) असं ठेवलं आहे. तसेच रोझी आई होणार आहे हे कळताच कुटुंबातील सदस्यांनी तिचं डोहाळजेवण करण्याचं ठरवलं. डोहाळजेवणासाठी सगळ्यात आधी महिला रोझीच्या शरीरावर लाल रंगाची ओढणी गुंडाळते आणि लाल टिकली लावून, तिच्या पायांत बांगड्यासुद्धा घालते आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा तिच्यावर वर्षाव करते. नंतर तिच्या आवडीचं अन्न तिला खाऊ घालते. तसेच आई होण्यासाठी ‘मी तयार आहे’ (I am Ready) अशी इंग्रजी अक्षरांत लिहिलेली पाटी रोझीसमोर ठेवलेली तुम्हाला दिसेल. पाळीव प्राण्याच्या डोहाळजेवणाचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच.

Mother cleaned the spilled cold drink in the metro
पालकांचे संस्कार मुलांना घडवतात! मेट्रोत सांडलेलं कोल्ड ड्रिंक केलं स्वच्छ… Video पाहून आईचं कराल कौतुक
hyderabad sun city gated community auctions ganesh laddu prasadam record rs 125 crore
अबब! गणपती बाप्पाच्या लाडूंना तब्बल १.२५ कोटींची बोली; काय आहे खासियत? जाणून घ्या….
mugdha prathamesh
प्रथमेश लघाटे मुग्धा वैशंपायनला ‘या’ नावाने मारतो हाक, गायकाने शेअर केलेल्या स्टोरीने वेधलं लक्ष
Boys and girls wanted for Ganapati dance in Visarjan ceremony Funny advertisement attracted attention
बाप्पाच्या मिरवणुकीत डान्स करण्यासाठी मुलं-मुली पाहिजेत! मजेशीर भरतीची जाहिरात होतेय व्हायरल

हेही वाचा… संतापजनक! “तुम्ही आता मेलात” वासुदेवाच्या वेशात आलेल्यांना सिंधुदुर्गात गावकऱ्यांकडून बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

रोझी आणि रेमोचे (Rosy & Remo ) खास डोहाळजेवण :

पाळीव प्राण्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे सन्मान देण्यात आला आहे आणि अगदी माणसांसारखे या खास पाळीव प्राण्यांच्या जोडप्याचं डोहाळजेवण आयोजित करण्यात आलं आहे. घरातील पलंगाची फुलांच्या माळांनी सजावट केली आहे आणि पलंगावर रोझी व रेमोला बसवण्यात आलं आहे. श्वान जोडप्यासमोर काही संदेश लिहिलेल्या पाट्यादेखील ठेवण्यात आल्या आहेत. तसेच रोझीदेखील या क्षणाचा पुरेपूर आनंद घेताना व्हिडीओत दिसतं आहे. आजवर तुम्ही प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील; पण प्राण्यांच्या डोहाळजेवणाचा हा अनोखा कार्यक्रम तुम्ही आजवर पाहिला नसेल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @rosyremotheretriver या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी श्वान जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. तर, काही जण ‘हे आधी कधीच पाहिलं नव्हतं… खूप मस्त आहे’, ‘इंटरनेटवरील सर्वांत सुंदर व्हिडीओ’ अशा शब्दांत अनेक जण कमेंट करताना व्हिडीओखाली दिसून आले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A family has organized a baby shower for a dog couple asp

First published on: 01-10-2023 at 14:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×