Viral Video : तुमच्यापैकी अनेकांनी शेतात खांबाला कपडे घालून उभं केलेलं बुजगावणं पाहिलं असेल. शेतामध्ये वन्य पक्षी प्राणी येऊ नये बुजगावणं उभारतात. पिकांची नासाडी करणाऱ्या पक्षांना घाबरवण्यासाठी हा उपाय केला जातो. गवत काडी आणि त्यावर मातीचे मडके, कपडे घालून मानवी आकाराचे बाहूले तयार केले जाते आणि हे बाहूले शेताच्या बांधावर मधोमध उभारले जाते. सध्या असाच शेतातील एक बुजगावण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून पक्षी किंवा प्राणी सोडा माणूस घाबरतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. (a farmer installed scary scarecrow looks like Ghost or bhoot video goes viral)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की शेतात एक बुजगावणं उभारलं आहे. हे बुजगावणं स्प्रिंगला धरून बांधले आहे. त्यामुळे ते सहज उड्या मारते. या बुजगावण्याचा आकार एका भूतासारखा दिसत आहे. व्हिीडओत तुम्हाला दिसेल की बुजगावण्याला फ्रॉक घातला आहे त्याव स्वेटर घातले आहे. डोक्याला रुमाल बांधली आहे त्यामुळे एखाद्या मुलीप्रमाणे आकार दिसतोय. स्प्रिंगला हँडल जोडून बुजगावणं त्याला हाताने धरून उड्या मारत आहे. व्हिडीओवर लिहिलेय, “पक्षी उडवायचे आहे की पूर्ण गाव खाली करायचं आहे”

CNBC Anchor hemant ghai
अरे ‘आवाज’ कुणाचा?
a child told a reason of crying to his father
“बाबा, रडल्याशिवाय तुम्ही घेऊन देत नाही” चिमुकल्याने सांगितले रडण्यामागचे कारण, VIDEO व्हायरल
Man lose his hand who was seating in bus window seat shocking accident video
तो निवांत बसला होता पण एका कृतीनं होत्याचं नव्हतं झालं; बसमध्ये तुम्हीही ‘असे’ करता का? थरारक VIDEO पाहाच
What Aditi Sarangdhar Said?
आदिती सारंगधरचं ट्रोलिंगवर स्पष्टीकरण, “गरोदर असताना घटाघटा बिअर प्यायचे नाही, लोकांनी उगाच..”
Flood Bridge Collapse Viral Video Suddenly Death In Just 2 Seconds
‘आयुष्यात एका सेकंदाचं महत्त्व काय?’ एका पावलाच्या अंतरावर होत्याचं नव्हतं झालं; ‘हा’ VIDEO बघून उडेल झोप
a bride wear varmala to groom a suddenly a third person come watch what happen next
VIDEO : क्षणात होत्याचे नव्हते झाले! नवरी नवरदेवाला वरमाला घालणार तितक्यात तिसरी व्यक्ती मध्येच आली अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ
old parents need your time
वृद्ध आई वडिलांना फक्त तुमचा वेळ हवा असतो! “मला काहीही नको फक्त तू पाहिजे” आजोबा लेकीचा संवाद व्हायरल, पाहा ह्रदयस्पर्शी VIDEO
old lady helps his old husband for walking emotional video
VIDEO : मरेपर्यंत साथ देणारा जोडीदार पाहिजे! वृद्ध पती पत्नीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : ही दोस्ती तुटायची नाय! लपलेल्या उंदराला शोधून मांजरीने केले असे काही…; Viral Video पाहून वाटेल आश्चर्य

व्हिडीओ पाहून तुम्हीही सुरूवातीला घाबरू शकता. रात्रीच्या अंधारात जर तुम्ही हे बुजगावणं पाहाला तर तुम्हाला कदाचित हे भूत आहे का, असे वाटू शकते. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : एक्झिट पोलवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस; भाजपच्या विजयावर युजर्सच्या ‘अशा’ प्रतिक्रिया; वाचून पोटभर हसाल

@NehaSamant14 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कल्पना करा कोणी रात्री पाहिले तर..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला वाटलं हे खरंच आहे” तर एका युजरने लिहिलेय, “मी तर गाव सोडेल” आणखी एका युजरने लिहिलेय,”लोकांना घाबरू शकतो” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया देत हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
यापूर्वीही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये व्यक्तीने भीतीदायक बुजगावणं शेतात उभं केलं होतं. रात्रीच्या अंधारात ते बुदगावणं सुद्धा भूत वाटत होतं.