Viral Video : वडील लेकीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा अन् आपुलकी दिसून येते. वडील आयुष्यभर लेकीला फुलाप्रमाणे जपतो आणि एकदिवस ती लेक जेव्हा सासरी जाते, तेव्हा सर्वात जास्त दु:ख हे वडिलांना होते. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुलगी सासरी जाताना वडील ढसा ढसा रडताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मुलीचे लग्न होते आणि तिचे संपूर्ण आयु्ष्य बदलते. तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी भावनिकदृष्ट्या हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. मुलगी सासरी जायला निघते, तेव्हा मुलीसह तिचे कुटुंब खूप भावूक होतात. असाच एका महिलेने तिच्या लग्नातील हा भावूक क्षण शेअर केला आहे. तिने लग्नातील व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरी सासरी जाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की वडील आणि मुलगी एकमेकांना मिठी मारत रडताना दिसत आहे. त्यांच्या आजुबाजूला कुटुंबातील अनेक लोक आहेत जे नवरीला ‘रडू नको’ असे म्हणताहेत. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की अख्ख कुटुंब व्हिडीओमध्ये भावूक होऊन रडताना दिसत आहे.
व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. जे वडील नेहमी खंबीर असल्याचे दाखवतात, त्यांना मात्र मुलगी सासरी जाताना पाहून अश्रु आवरत नाही. व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांचे वडील आठवतील तर काही लोकांना त्यांच्या मुलीची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Fathers Day 2024 : “तुम्ही सोडून गेला आणि आम्हाला ‘बाप’ कळला” मुलीचं वडिलांना भावनिक पत्र

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : इतर राष्ट्रप्रमुख फोटोसाठी उभे असताना जो बायडेन मात्र भलतीकडेच निघाले; जॉर्जिया मेलोनींनी लक्षात आणून दिल्यावर ऐटीत काढला फोटो!

surbhi.guptaaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माझ्या कुटुंबात सर्वात लाडात वाढलेली मी पहिली मुलगी आहे. जेव्हा मला सासरी जाण्याचा तो क्षण आठवतो, तेव्हा माझे हृदय भरून येते. मी एक व्हिडीओ शेअर करत आहे जो पाहल्यानंतर माझ्या डोळ्यांत नेहमी पाणी येते. मी क्लिप माझ्यासाठी अत्यंत खास आहे. मला त्याच्या पत्नी म्हणण्याचा अभिमान वाटेल पण त्यापूर्वी मी माझ्या वडिलांची मुलगी म्हणून ओळखली जाईल.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला का रडू येत आहे” तर एका युजरने लिहिलेय, “सर्वात कठीण क्षण असतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे दु:ख फक्त मुलीच समजू शकतात”