Viral Video : वडील आणि मुलीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी असते. वडिलांच्या काळजाचा तुकडा असलेली लेक जेव्हा लग्नानंतर सासरी जाते, प्रत्येक वडिलांसाठी तो क्षण खूप कठीण असतो. लहानाचं मोठं केलेल्या लेकीला दुसऱ्याकडे सोपविणे, हे कोणत्याही वडिलांसाठी असहनीय असते. त्यामुळे लेकीचे लग्न हा फक्त त्या मुलीसाठी नाही तर तिच्या आईवडिलांसाठी अत्यंत भावूक क्षण असतो.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वडील लेकीबरोबर फोटो काढताना दिसत आहे. पण फोटो काढताना वडिलांचे डोळे पाणावतात आणि त्यांचा कंठ दाटून येतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (a father eyes were filled with tears while capturing photo with daughter)

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नघरातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मुलीने हिरवी साडी नेसली आहे आणि हातात हिरवा चुडा घातला आहे. तिने हाताला सुंदर मेहेंदी लावली आहे. नाकात नथ आणि केसांमध्ये गजरा माळला आहे. ती मराठमोळ्या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. लग्नापूर्वीच्या एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. त्याचबरोबर या मुलीच्या वडिलांनी पांढरा शुभ्र असा सदरा घातला आहे.

हेही वाचा : अधिकाऱ्याचे कारवरील नियंत्रण सुटले अन् सुसाट कारने एका महिलेसह दोन मुलींना उडवले, थरारक लाईव्ह अपघाताचा VIDEO समोर

व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की वडील लेकीबरोबर फोटो काढत आहे. फोटो काढताना वडिलांचे डोळे पाणावतात आणि तरीसुद्धा ते स्मित हास्य करत मुलीबरोबर फोटो काढताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल. व्हिडीओ पाहून काही जणांना त्यांच्या वडिलांची आठवण येईल तर काही लोकांना सासरी गेलेल्या त्यांच्या मुलीची आठवण येईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

devyaniware_makeupartist या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वडील लेकीचं प्रेम” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “त्यांचे डोळे सर्वकाही बोलून गेले” तर एका युजरने लिहिलेय, ” खुप नशीब लागतं वडिलांचे प्रेम आणि साथ आयुष्यभर बरोबर राहायला.. खुप अवघड असते त्यांच्या शिवाय जगणे.” आणखी एका युजर्सनी लिहिलेय, “आपल्या मुलीसाठी बाप काहीही करू शकतो” एक युजर लिहितो, “वाघासारखा बाप पण मुलीसाठी डोळ्यांत पाणी आणतो हेच सर्व सांगून जातं”