Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ तरुणीने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचे वडील तिच्या आईला स्वयंपाकघरात मदत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की तरुणीची आई स्वयंपाकघरात काम करत आहे आणि तिच्या शेजारी तिचे वडील सुद्धा स्वयंपाकघरात काम करत आहे. या व्हिडीओवर ” जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला” हे सुंदर गाणे लावले आहेत. या व्हिडीओवर तरुणीने कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गेल्या ३५ वर्षांपासून माझे वडील या गोष्टीची काळजी घेतात की माझ्या आईला स्वयंपाकघरात एकटे काम करावे लागणार नाही” हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. काही लोकांना त्यांच्या आई वडीलांची आठवण येऊ शकते. (a father helps mother from last 35 years a true lovely life partner a daughter shared post viral)

हेही वाचा : Reasi Attack: पाकिस्तानी गोलंदाज हसन अलीची वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवरील हल्ल्याविरुद्ध पोस्ट; भारतीयांनी केलं कौतुक

पाहा व्हायरल व्हिडीओ

पती पत्नीचे नाते हे जगावेगळे नाते असते. या नात्यात काळजी, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. लग्नानंतर दोन व्यक्ती नव्या आयुष्याची सुरूवात करतात आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देतात. एकमेकांच्या सुख दु:खात एकमेकांचे वाटेकरी होतात. हा व्हिडीओ पाहून कोणालाही असा जोडीदार असावा, असे वाटेल.

हेही वाचा : धक्कादायक! जंगल सफारी दरम्यान पर्यटकांच्या कारजवळ आला जिराफ अन्… VIDEO पाहून फुटेल घाम

cadbury14 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुमचा जोडीदार नेहमी हुशारीने निवडा” एका युजरने लिहिलेय, “असा नवरा प्रत्येकाला भेटत नाही” तर एका युजरने लिहिलेय, “याला प्रेम अन् काळजी म्हणतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही महिला खूप भाग्यवान आहे.” अनेक युजर्सनी लिहिलेय की त्यांचे वडील सुद्धा त्यांच्या आईला असेच मदत करतात. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी या तरुणीच्या वडिलांवर कौतुकाचा वर्षाव केला आहेत तर काहींना त्यांच्या वडीलांची आठवण आली.