Viral Video : वडील आणि मुलीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी दिसून येते. वडिलांसाठी मुलगी जीवाचा तुकडा असते. मुलीच्या सुखासाठी वडील वाट्टेल ते करतो. तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी सतत प्रयत्न करतो. मुलीचे लग्न हा एका वडिलासाठी सर्वात कठीण असतो.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक वडील साडी नेसलेल्या आपल्या लेकीचे फोटो काढताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (a father is capturing photos of his daughter video goes viral on social media)

small boy stuck in lift
VIDEO : “तू आई नाही; मूर्ख बाई आहेस”, महिला मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यासाठी थांबताच चिमुकला लिफ्टमध्ये शिरला; पाहून काळजाचा ठोका चुकेल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
do you see the richest mother in the world
Video : जगातील सर्वात श्रीमंत आई पाहिली का? असे मुलं प्रत्येक आईच्या पोटी जन्माला आली पाहिजे; महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ होतोय व्हायरल
Baba abuses young girl on the name of treatment touches badly in front of her parents shocking video viral
“आई वडिलांना पोटच्या मुलीचा त्रास कळत नाही?” उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाचा तरुणीला अश्लील स्पर्श! VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे

लीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील

असं म्हणतात, वडिलाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी दिसेल. तिने साडी नेसली आहे. साडीमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिचे वडील फोटो काढत आहे आणि ती हटके पोझ देताना दिसत आहे. वडील फोटो काढल्यानंतर तिच्याजवळ जातात आणि तिचे कौतुक करून दृष्ट काढतात. या व्हिडीओवर लिहिलेय, “काहीही म्हणा पण बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं” हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. काही लोकांना त्यांच्या लेकीची तर काहींना त्यांच्या वडिलांची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : विदर्भातील तरुणांनी चुलीवर बनवली झणझणीत वांग्याची रस्सा भाजी अन् खुसखुशीत बिट्ट्या; VIDEO पाहून तोंडाला सुटेल पाणी

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

komal_kharade_beauty_care या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बाप लेक”

हेही वाचा : काय सांगता? पाणीपुरी विक्रेत्याने कमावले तब्बल ४० लाख! ऑनलाईन पेमेंट्स पाहून आयकर विभागाने पाठवली GST नोटीस

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हो अगदी खरं आहे कारण बापाची आई व्हायचं सामर्थ्य फक्त लेकीतच असतं…” तर एका युजरने लिहिलेय, “बाप तर बाप असतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “आपल्या आयुष्यात एकच तर व्यक्ती अशी असते जी आपल्याला समजून घेते ती म्हणजे आपले बाबा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. सोशल मीडियावर बापलेकीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी दाखवणारे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे भावनिक व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात.

Story img Loader