scorecardresearch

ऐकावं ते नवलच! ‘या’ कंपनीत गांजा पिणाऱ्याला मिळणार महिना ७ लाखांचा पगार; कसा ते जाणून घ्या

औषध म्हणून गांजाची विक्री करणाऱ्या एका कंपनीने गांजा पिणाऱ्या व्यक्तींसाठी नोकरभरती केली जाणार आहे

Cannabis Sommelier
अनेक देशांमध्ये गांजाची विक्री आणि वापर करण्यासाठी कायदेशीर परवानगी द्यावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. (Photo : Freepik)

भारतासह अनेक देशांमध्ये गांजाची विक्री आणि नशा करण्यावर बंदी आहे. तर अनेक देशांमध्ये गांजाची विक्री आणि वापर करण्यासाठी कायदेशीर परवानगी द्यावी अशी मागणीही सातत्याने करण्यात येत आहे. अशातच आता गांजा पिणाऱ्यांसाठी जॉब निर्माण झाल्याची बातमी समोर आली आहे. ही बातमी वाचल्यावर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.

हो कारण जर्मनीमध्ये औषध म्हणून गांजाची विक्री करणाऱ्या एका कंपनीने गांजा पिणाऱ्या व्यक्तींसाठी नोकरभरती काढली आहे. त्यानुसार या कंपनीत नोकरी करणाऱ्या व्यक्तीला रोज गांजा फुकावा लागणार आहे आणि त्याचे त्याला पैसेही मिळणार आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या गांजा फुंकणाऱ्याला कंपनी एक दोन नव्हे तर महिन्याला ७ लाखांपेक्षा जास्तीचा पगार देणार आहे. त्यानुसार या व्यक्तीला वार्षिक ८८ लाख रुपयांचे पॅकेज मिळणार आहे.

हेही पाहा- टायटॅनिकचे आतापर्यंत कोणीही न पाहिलेले दुर्मिळ फुटेज आले समोर; Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

कंपनीने या पदाला ‘वीड एक्स्पर्ट’ (Weed Expert) असे नाव दिले आहे. शिवाय या पदावर काम करणाऱ्यांना गांजाीची गुणवत्ता तपासण्याचे काम करावे लागणार आहे. या जर्मन कंपनीचे नाव Cannamedical असून ती ‘कॅनॅबिस सोमेलियर’ म्हणजेच गांजा तज्ञांची नियुक्त करण्यासाठी एक पोस्ट जारी केली आहे. औषध म्हणून गांजा विकणारी ही कंपनी गांजाचा वास घेऊन तो चांगल्या क्लॉलिटीचा आहे की नाही? हे तपासण्यासाठी कामगार शोधत आहे. यासठी कंपनी वार्षिक ८८ लाख रुपयांचे पॅकेजही देण्यास तयार आहे.

हेही वाचा- बापरे! जन्माला आली चक्क शेपटी असलेली मुलगी, ६ सेंटीमीटरची शेपटी पाहून डॉक्टरही झाले थक्क

काय काम करावं लागणार?

कंपनीचे सीईओनी सांगितलं की, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, पोर्तुगाल आणि डेन्मार्क सारख्या देशांमध्ये गांजाची गुणवत्ता तपासू शकेल अशा व्यक्तीच्या शोधात आम्ही आहोत. या देशांमधून जर्मनीत गांजा येतो. त्यामुळे या पदावर रुजू होणाऱ्या गांजा तज्ज्ञांना जर्मनीत येणाऱ्या गांजाची गुणवत्ता तपासावी लागणार आहे. कंपनीचे सांगितलं की, या पदावर काम करणारी व्यक्ती गांजा एक्सपर्ट असणे आवश्यक आहे. शिवाय त्या व्यक्तीकडे गांजा ओढण्याचा परवाना असणेही आवश्यक आहे. जर्मनीत मागील वर्षीच गांजा पिण्याला कायदेशीर मान्यता देण्यात आली असून तो केवळ उपचारासाठीच वापरण्यात येईल, अशी अट घालण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 12:01 IST
ताज्या बातम्या