scorecardresearch

Viral Video in Metro : मेट्रोत साडी नेसून भिरभिर फिरणाऱ्या चिमुकलीवरुन कुणाचीच नजर हटेना, तुम्हीही VIDEO एकदा पाहाच

या व्हिडीओमध्ये ही चिमुकली मेट्रोत भिरभिर फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चिमुकलीने साडी नेसली आहे आणि मेट्रोतील प्रवासी या गोंडस मुलीकडे कौतुकाने बघत आहे.

a girl child wearing pink saree walking around in metro passenger watching cute girl video goes viral
मेट्रोत साडी नेसून भिरभिर फिरणाऱ्या चिमुकलीवरुन कुणाचीच नजर हटेना, तुम्हीही VIDEO एकदा पाहाच (Photo : Instagram)

Viral Video in Metro : सोशल मीडियावर मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ अगदी थक्क करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली मेट्रोत भिरभिर फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चिमुकलीने साडी नेसली आहे आणि मेट्रोतील प्रवासी या गोंडस मुलीकडे कौतुकाने बघत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ मेट्रोतील असून या या मेट्रोतील सर्व प्रवाशांचे एका चिमुकलीने लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की साडी नेसलेली गोंडस छोटी मुलगी मेट्रोमध्ये इकडे तिकडे फिरत आहे. चिमुकलीचे गोंडस हसू पाहून तुमचीही नजर हटणार नाही. मेट्रोतील प्रवासी सुद्धा तिच्याकडे गोड नजरेने बघताना व्हिडीओत दिसत आहे.
जन्माष्टमीनिमित्त या चिमुकलीने साडी नेसली असावी. गुलाबी साडीत ही चिमुकली खूप सुंदर आणि गोंडस दिसतेय. साडीबरोबरच तिने डोक्यावरुन गुलाबी रंगाची ओढनी घेतली आहे. तिचा लूक अगदी छोट्या राधेसारखा दिसतोय.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule on sunetra pawar baramati loksabha election
बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, म्हणाल्या…
harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान

हेही वाचा : Mumbai Police : मुंबई पोलिसांची कुठेही तोड नाही! गणपती आगमनाच्या वेळी पोलिसाने वाजवला ढोल-ताशा; जुना व्हिडीओ व्हायरल

kolkata_oikkotaan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर लिहिलेय, “किती सुंदर दिसतेय चिमुकली” तर एका युजरने लिहिलेय, “किती गोड हसत आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “सुंदर, खूप खूप आशीर्वाद”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-09-2023 at 17:31 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×