Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ भावूक करणारे असतात. काही व्हिडीओ खूप काही शिकवणारे असतात. सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भर स्टेजवर जोडीदाराने साथ सोडल्यामुळे एक चिमुकली एकटीच डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (a girl dance alone as dance partner left her)

हा व्हायरल व्हिडीओ एका शाळेच्या कार्यक्रमातील आहे. व्हिडीओमध्ये छोटी मुले जोडीने डान्स करताना दिसत आहेत. प्रत्येक जण त्याच्या जोडीदाराबरोबर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक चिमुकली सर्वांचे लक्ष वेधून घेते कारण ती एकटीच डान्स करताना दिसते. तिचा जोडीदार एका जागी उभा राहून रडताना दिसतो मात्र ती चिमुकली थांबत नाही आणि तिची भूमिका पार पाडते आणि एकटीच सर्व डान्स स्टेप्स करताना दिसते. चिमुकलीचा हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “या छोट्या मुलीने एक गोष्ट तर नक्कीच शिकवली कोणाकडून अपेक्षा करू नका की तो तुमच्या बरोबर असेलच म्हणून तुम्ही तुमची भूमिका प्रामाणिकपणे निभवा आणि बाकी सगळं देवावर सोडा.”

हेही वाचा : “लेक परक्याचे धन, बाबा तुटतो आतून..” सासरी जाणाऱ्या मुलीला मिठी मारत वडील ढसा ढसा रडले, VIDEO पाहून तुम्हालाही येईल रडू

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : इतर राष्ट्रप्रमुख फोटोसाठी उभे असताना जो बायडेन मात्र भलतीकडेच निघाले; जॉर्जिया मेलोनींनी लक्षात आणून दिल्यावर ऐटीत काढला फोटो!

maz_man_tuzyat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आपण प्रामाणिक आहोत हे ओरडून नाही तर ते नातं निभावून दाखवा, सांगायची गरज पडत नाही” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एवढ्या छोट्याशा वयात कळत नकळत किती समजुतदारीने निभावून घेतलं या मुलीने, ही समज मोठ मोठ्यांना नाही” तर एका युजरने लिहिलेय, “जगात येताना एकटे आलो, जाताना पण एकटे जाऊ; मग जगताना नकोच कोणाकडून अपेक्षा आणि जिथे अपेक्षा आली तिथे दुःख” आणखी एका युजरने लिहिलेय, “ती सुंदर आणि धाडसी आहे” अनेक युजर्सनी या चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.