Viral Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही अपघाताचे व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. मुलीचे स्कुटीवरील अपघात सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय असतात. यावरून पापा की परी म्हणून स्कुटी चालवणाऱ्या मुलींवर टीका केली जाते. सध्या असाच एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका मुलीचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तिची स्कुटी चक्क कॅफेमध्ये जाऊन धडकली. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (a girl drove her scooty straight into cafe)

या व्हायरल व्हिडीओ एका कॅफेच्या बाहेरचा आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की काही लोक कॅफेच्या बाहेर बसलेले आहेत आणि वेटर काही ग्राहकांनी ऑर्डर केलेले पदार्थ घेऊन येत आहे. या दरम्यान असे काही होते की कोणाचाही विश्वास बसत नाही. एक मुलगी तिची स्कुटी घेऊन थेट कॅफेमध्ये येते. नियंत्रण सुटल्याने तिची स्कुटी कॅफेच्या आवारात धडकते. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की स्कुटीचा पहिला चाक हवेत आहे आणि मुलगी मागच्या सीटवर बसली आहे. तरुणीला असे स्कुटी घेऊन कॅफेमध्ये शिरताना पाहून सर्व जण अवाक् झालेले दिसतात. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

two school girls performing stunts together on the road One stands Second Student shoulders and does a backflip in the air watch ones
रीलचा मोह अंगलट! शाळकरी विद्यार्थिनींचा भररस्त्यात विचित्र स्टंट; खांद्यावर चढली, बॅकफ्लिप मारायला गेली अन्…; VIDEO व्हायरल
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Killy Paul sister Neema Paul stunning dance
‘देखा तेनु पहली पहली बार’ गाण्यावर किली पॉलची बहीण नीमा पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत एक्स्प्रेशनचे कौतुक
How Do Shopkeepers Cheat Desi Jugaad Video Viral on social Media
फळ-भाजी विक्रेते तराजूने कशी फसवणूक करतात बघा; पुढच्या वेळी नुकसान टाळायचं असेल तर ‘हा’ VIDEO पाहाच
Did you ever notice this mistake in Navra Mazha Navsacha movie
Video: ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘ही’ चूक कधी तुम्हाला लक्षात आली का? व्हिडिओ होतोय व्हायरल
Vashu Bhagnani denies selling office space to pay debt
२५० कोटींचे कर्ज फेडण्यासाठी विकलं ऑफिस? आमदार धिरज देशमुखांचे सासरे म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून…”
vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”

हेही वाचा : VIDEO : भयंकर! जमिनीवर पाडले, लचके तोडले; ती किंचाळत राहिली अन्…मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर १५ कुत्र्यांचा हल्ला

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : बारावं मूल झाल्याचं एलॉन मस्क यांनी लपवून ठेवलं? तर्क-वितर्कांना उधाण, चर्चा सुरू होताच म्हणाले, “हे काही सिक्रेट…”

g_se_gyani_asli या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अरे ताई” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “रेस्टॉरंटची चूक आहे, कारण त्यांनी रस्त्याच्या शेजारी रेस्टॉरंट उघडले आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “वाइल्ड कार्ड एन्ट्री” आणखी एका युजरने लिहिलेय, “ताई म्हणत असेल की ही काय जागा आहे हॉटेल उघडण्याची.”

काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये तरुणी स्कुटी सह मेडीकलमध्ये शिरली होती. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या तरुणीवर जोरदार टिका केली होती.