scorecardresearch

Premium

एकट्या मुलीने एका झटक्यात सहा मुलांना केले गार; सोशल मीडियावर समोर आला थक्क करणारा Video

काही मुले एका मुलीला चारही बाजूंनी घेरतात आणि तिचा छळ करू लागतात, मात्र यावेळी मुलीने सर्वांना चोख उत्तर दिले.

A girl fought with six boys alone
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Photo : Twitter/@TheFigen)

जगभरातील लाखो स्त्रिया दररोज लैंगिक छळाच्या बळी पडतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. गुन्हेगारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी महिलांना अनेकदा स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेण्यास सांगितले जाते. तथापि, आजकाल मुली खूप हुशार झाल्या आहेत आणि त्यांना स्वतःचा बचाव करत अडचणीतून कसे बाहेर पडायचे हे माहित आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही मुले एका मुलीला चारही बाजूंनी घेरतात आणि तिचा छळ करू लागतात, मात्र यावेळी मुलीने सर्वांना चोख उत्तर दिले.

इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक धाडसी मुलगी तिला त्रास देणार्‍या आणि धमकावणार्‍या सहा मुलांपासून स्वतःचे रक्षण करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सहा लोक एका सुनसान रस्त्यावर एका मुलीला घेरून त्रास देताना दिसत आहेत. व्हिडीओचे ठिकाण अद्याप समजू शकलेले नाही. मुलगी मग त्या मुलांशी भांडते आणि मार्शल आर्ट्सच्या मूव्ह्स आणि फ्लाइंग किकसह त्यांना जमिनीवर पाडते. तिने सर्व सहा मुलांना एक एक करून पायाने लाथ मारून खाली पाडले. २५ सेकंदांचा हा व्हिडीओ ‘द फिगेन’ अकाउंटने ट्विटरवर पोस्ट केला आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मुलींना त्रास देऊ नका!’ या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत ३५ लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि ९ हजारहून अधिक वेळा हा व्हिडीओ शेअर केला गेला आहेत.

रस्त्यावरील मुलीसोबत करत होता Prank; नंतर करून घेतला स्वतःचाच जाहीर अपमान; पाहा Viral Video

हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचा अंदाज या व्हिडिओवरून लावता येतो. नेटिझन्स तिच्या शौर्य आणि सामर्थ्याने मोहित झाले होते, तर अनेकांनी असंतोष व्यक्त केला की महिलांना दररोज इतका त्रास सहन करावा लागतो. एका यूजरने लिहिले की, ‘कोणत्याही मुलीला असा संघर्ष करावा लागू नये. तुमच्या मुलांना शिकवा की हे कधीही ठीक नाही. दुसऱ्याने लिहिले, ‘निंजाचे खरे उदाहरण.’

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A girl fought with six boys alone surprising video surfaced on social media pvp

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×