Viral Video : असं म्हणतात, लग्नानंतर मुलीचे आयुष्य बदलते. आईवडिलांचे घर सोडून तिला परक्या घरी जावं लागतं. दुसऱ्याच्या घराला आपलं घर मानावं लागतं. हा एका मुलीच्या आयुष्यातला खूप मोठा त्याग असतो. लग्नानंतर एका मुलीला भीती असते ती सासूबाईची. अनेक टिव्ही मालिकांमध्ये सासूबाईची प्रतिमा ही अतिशय नकारात्मक दाखवली जाते. त्यावरून लग्नानंतर सासूबाईबरोबर पटेल का, हा प्रश्न अनेकांना पडतो. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली आई आणि सासूबाईमधील फरक सांगताना दिसते. आईप्रमाणे सासूबाईचे योगदान सुद्धा तितकेच मोलाचे, हे सांगताना दिसते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये चिमुकली सांगते,
“जन्म देते ती आई, पण जीवनसाथी देते ती मात्र सासूबाई.
संस्कार करते ती आई, संस्कार करणे शिकवते ती मात्र सासूबाई.
मुलापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करते ती आई, पण आपल्याच मुलाचा हात दुसऱ्या मुलीच्या हाती सोपवते, ती म्हणजे सासूबाई
समंजस बनवते ती आई, पण सुधरवते ती म्हणजे सासूबाई
आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याला सोपवते ती म्हणजे आई, पण दुसऱ्याची लक्ष्मी आपल्या घरात घेऊन येते, ती मात्र सासूबाई
ठेच लागली की आठवते आई, पण जखमेवर मलम लावते ती मात्र सासूबाई.
ते म्हणतात ना सासू कधी आई होऊ शकत नाही, पण आईपेक्षा कमी सुद्धा नाही.”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
हेही वाचा : एवढी हिंमत येतेच कुठून? स्वत:च्या बायकोसमोर शेजारी तरुणीसोबत केलं संतापजनक कृत्य; VIDEO पाहून बसेल धक्का
gauri_chilbile_16 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आई आणि सासूबाई” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लय भारी ग बाळा खूप मस्त बोली ग तू आणि खरं बोली तु” तर एका युजरने लिहिलेय, “आई ची जागा कोणी घेऊ शकत नाही बाळ आई ती आईच असते” आणखी एका युजरने लिहिलेय, “लग्न झालं की कळेल. ती आई असते. आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही.” एक युजर लिहितो, “ऐकून खूप छान वाटलं” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.