घरात पाळलेला प्राणी हा सदस्यापेक्षा कमी नसतो. घरातील सदस्याप्रमाणे पाळीव प्राण्यांचे लाड केले जातात. प्राणीप्रेमी त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात. माणसांच्या सहवासात राहून अनेकदा प्राणी माणसांच्या सवयची नक्कल करू लागतात. आता या बकरीचा व्हायरल व्हिडीओ पाहा जी एक ग्लास चहा प्यायल्याशिवाय काहीही खात नाही. व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसू शकतो. माणसांना चहाच व्यसन असते हे तुम्ही ऐकले असेल पण बकरीला देखील चहाचे व्यसन लागल्याचे प्रथमच ऐकले असेल. सोशल मीडियावर एका बकरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जी चक्क चहा पित आहे. व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून एक तरुणी तिच्या पाळीव बकरीच्या या विचित्र सवयीबद्दल सांगत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

हेही वाचा – “मुंबईकरांपेक्षा हुशार आहे हा कुत्रा”, लोकलमध्ये प्रवास करताना चक्क कुत्र्याने पाळली शिस्त, Video Viral नेटकरी झाले अवाक्

Katrina kaif wearing black patch arm fitness glucose levels benefits expert tips
नवरात्रीत कतरिना कैफच्या हातावर दिसला काळा पॅच, याचा कोणत्या आजाराशी आहे संबंध? तज्ज्ञांनी केला खुलासा
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Fasting On Navratri? These Tips Will Make Sure Your Nine Days Are A Breeze Diet Tips Ashadhi Ekadashi Upwas Fasting
Navratri 2024: नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? खा हे पदार्थ, दिवसभर राहाल एनर्जेटिक
Man putting hand inside crocodiles mouth crocodile shocking video
VIDEO: “कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, तरुणानं मगरीबरोबर केलेलं कृत्य पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?
obscene messages and calls chaturang article loksatta
‘भय’ भूती : भयाचा तप्त ज्वालामुखी
article analysis about close relationships zws 70
तुम्हालाही आहे जवळीकतेचं वावडं ?
ajit pawar sharad pawar ulta chashma
उलटा चष्मा : घरफोडीला लगाम!
hindu names of hijackers controversy
भावना दुखावून घेण्याची साथ आली आहे का? आयसी-८१४ वरील वाद हे त्याचंच लक्षण…

चहा पिणारी बकरी
या व्हायरल व्हिडिओमध्ये मुलीने सांगितले की, तिची बकरी चहा प्यायल्याशिवाय काहीही खात नाही किंवा पीत नाही. व्हिडिओमध्ये जेव्हा मुलीने ग्लास भरून चहा बकरीसमोर ठेवला तेव्हा बकरीने लगेच तो तोंडात पकडून चहा प्यायला सुरुवात केली. बकरीला चहा पिताना क्वचितच कोणी पाहिलं असेल. हा व्हिडिओ पाहून अनेकांना विश्वास बसणार नाही. हा व्हिडीओ हेच दिसते की, हा फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांना देखील चहा आवडतो. चहा प्रेमी हा केवळ माणूसच नाही तर प्राणीही असू शकतो हे या व्हिडिओने सिद्ध केले. व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे.

हेही वाचा- ”आधी मेट्रो, मग रेल्वे अन् आता विमानतळावर विचित्र डान्स करतेय तरुणी, Viral Video पाहून संतापले नेटकरी


लोकांना आश्चर्य वाटले
बकरीचा चहा पिण्याची व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. हा व्हिडिओ ghantaa नावाच्या पेजवर यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओला लाखो व्ह्यूज आहेत. व्हिडिओ वर लोक खूप मजेदार कमेंट करत आहेत. एका व्यक्तीने लिहिले- “ही(बकरी) वाघबकरी टी कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे.”