Premium

VIDEO : जेव्हा मराठमोळ्या आजीला नात हिंदी गाणं शिकवायला जाते…; व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर हसू आवरणार नाही…

सध्या असाच एका नात आणि आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नात आजीला हिंदी गाणं शिकवताना दिसत आहे. आजीचे हिंदी ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा मजेशीर व्हिडीओ एकदा पाहाच.

funny video goes viral instagram
जेव्हा मराठमोळ्या आजीला नात हिंदी गाणं शिकवायला जाते… (Photo : Instagram)

Viral Video : आजी नातवंडांचं नातं हे जगावेगळं असतं. या नात्यात मैत्री, निखळ प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि एकमेकांविषयी आपुलकी असते. एकमेकांपासून ते बरंच काही शिकत असतात. आजी नातवंडांना तिच्या जीवनानुभवातून बऱ्याच गोष्टी शिकवते; तर नातवंडंसुद्धा आजीला नवनवीन गोष्टी शिकवत असतात.
सध्या असाच एका नात आणि आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नात आजीला हिंदी गाणं शिकवताना दिसत आहे. आजीचे हिंदी ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा मजेशीर व्हिडीओ एकदा पाहाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये आजी आणि नात निवांत बसलेले असतात. नात आजीला “ये दिल.. दीवाना.. दीवाना है ये दिल” हे हिंदी गाणं शिकवताना दिसत आहे. सुरुवातीला नात गाण्याचे शब्द म्हणते आणि त्यानंतर तेच शब्द आजी पुन्हा म्हणते. आजी अनेक शब्द चुकीचे उच्चारते, तरीसुद्धा नात तिला शिकवण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओत दिसत आहे. आजीचे हिंदी ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल. एवढंच काय, तर नात आणि आजीची ही गोड मैत्री पाहून तुम्हालाही तुमच्या आजीची आठवणसुद्धा येऊ शकते.

हेही वाचा : बापरे! कुत्र्याने चक्क तोंडात लपवले टोमॅटो, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

bindhast_mulgi या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून असे अनेक आजीबरोबरचे व्हिडीओ या अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत.
या व्हिडीओतील आजीवर युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “खूप छान …! आजीने प्रयत्न केला! जीवनात प्रयत्न करणे सोडू नका”, तर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून मजा आली… आजीचा किती गोड आवाज आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी दहा वेळा हा व्हिडीओ पाहिला.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A granddaughter teach marathi grandmother hindi song funny video goes viral instagram social media ndj

First published on: 21-09-2023 at 12:26 IST
Next Story
गौर गोपाल दास यांना दीक्षा घेण्याआधी आवरता आला नाही ‘पीयूष’ प्यायचा मोह; जाणून घ्या ‘पीयूष’ या पेयाचा इतिहास