Viral Video News : आजी आणि नातवंडाचे नाते जगावेगळे असते. ती अशी व्यक्ती असते जी नातवंडावर जीवापाड प्रेम करते. त्यांच्या आनंदासाठी वाट्टेल ते करते. त्यांच्याबरोबर लहान होऊन कधी खेळते तर कधी हसते. नातवंडाच्या छोट्या छोट्या गोष्टींवर ती आनंद व्यक्त करते.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की नातवाने गाडी खरेदी केल्यानंतर आजीच्या आनंदाला पारावा नव्हता.नातवाबरोबर फोटो काढण्यासाठी आजी थेट गाडीवर चढली. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल. काही लोकांना व्हिडीओ पाहून त्यांच्या आजीची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Viral video new in marathi)

peacocks die of electrical shock in bhadravati city
चंद्रपूर : सर्वांना भुरळ घालणाऱ्या मोराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
nagpur dog bite police marathi news
नागपूर : अटक करायला आलेल्या पोलिसांच्या अंगावर सोडला कुत्रा!
Seat Belt in Car
कारमध्ये सीट बेल्ट लावणे का आवश्यक आहे? तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ‘हा’ Video एकदा पाहाच, तुम्हालाही समजेल!
A cage has been set up to imprison leopards at Dhagae Vasti Pune print news
ढगे वस्ती येथे बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे; विबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
Ramzhu hit and run case Lack of investigation by police to protect Ritu Malu Nagpur
नागपूर : रामझुला हिट अँड रन प्रकरण; आरोपी रितू मालू धनाढ्य असल्याने पोलिसांकडून तपासात उणिवा…
Bullying a woman to board a bus
अरे बापरे! बसमध्ये चढण्यासाठी महिलेची दादागिरी; VIDEO पाहून कपाळावर माराल हात
Pimpri, Bomb Threats, Hospitals, VPN, IP Address, Nigdi Police, Email Threat,
पिंपरीतील रुग्णालय उडवण्याची धमकी देण्यासाठी ‘व्हीपीएन’चा वापर; पोलिसांची ‘गुगल’कडे धाव

नातवाबरोबर फोटो काढण्यासाठी आजी थेट गाडीवर चढली

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक नातवाने नवीन कार खरेदी केली आहे. आणि या गाडीच्या मागच्या काचेवर त्याने आजीबरोबरचा एक फोटो लावला आहे आणि आजीचे नाव लिहिलेय, “सुंदरा आजी” व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आजी गाडीवर चढताना दिसत आहे. आजीला फोटो काढताना पाहून नातू म्हणतो, “अगं पडशील चढू नको” त्यावर आजी नातवाला गप करत गाडीवर चढते. आणि त्यानंतर गाडीवर बसून नातवाबरोबर फोटो काढते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “आजी जोमात , नातू कोमात”

हेही वाचा : शौचास बसलेल्या व्यक्तीच्या शरीराला भलामोठ्या अजगराचा विळखा अन् गिळणार तितक्यात…; जंगलातील धडकी भरविणारा Video Viral

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Pakistan Woman Social Post: “पाकिस्तानमध्ये मुलगी म्हणून जगणं फार कठीण”, तरुणीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल; सांगितला धक्कादायक अनुभव!

sundarabai1948 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गप अय कडू मला गाडीवर बसायचंय” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजच्या काळातली सगळ्यात सुखी आणि समाधानी आजी. नशीब लागतंय असा नातू मिळायला” तर एका युजरने लिहिलेय, “तु खुप नशीबवान आहे भावा तुझ्याबरोबर आजी आहे तुझा व्हिडिओ बघितल्यावर मला माझी आजी आठवते” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरच खूप छान वाटतं. तुमचे व्हिडीओ बघून मी सुद्धा माझ्या आजीला असाच जीव लावायचो . आज पंधरा वर्ष झाले, माझी आजी मला सोडून जाऊन.”