Viral Video : महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक मराठी माणूस जगत असतो. त्यांच्या विचारांवर चालत आयुष्यात पुढे जातात. कोणत्या प्रसंगी महाराजांचे स्मरण करून नवीन कार्याची सुरूवात केली जाते.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडीओध्ये शिवगर्जना म्हणत एका नवरदेवाने त्याच्या वैवाहिक आयुष्याची सुरूवात केली आहे. हा नवरदेवाने भर मांडवात शिवगर्जना म्हणताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ( a groom chants shivgarjana by saying chatrapati shivaji maharaj ki jay and starts his married life)

नवरदेवाने शिवगर्जना म्हणत केली वैवाहिक आयुष्याची सुरुवात

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला मांडवात लोकांची गर्दी दिसून येईल. नवरदेव आणि नवरी स्टेजवर उभे आहेत आणि त्यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. या मूर्ती समोर नवरदेव शिवगर्जना म्हणताना दिसत आहे. शिवगर्जना म्हणताना लग्नाच्या मांडवातील प्रत्येक जण महाराजांचा जयजयकार करताना दिसत आहे. सध्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रत्येक शिवप्रेमींना हा व्हिडीओ खूप आवडेल.
तुम्ही लग्नात गाणी डिजे लावून डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण या व्हिडीओमध्ये तरुणाने जे केले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या तरुणाने प्रत्येक मराठी माणसाचे मन जिंकले आहे.

हेही वाचा : कुस्तीचा असा डाव कधीच पाहिला नसेल; अवघ्या ४० सेकंदात धोबीपछाड, बेळगावमधल्या जंगी कुस्तीचा Video Viral

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Optical Illussion : कोणती इमारत पुढे अन् कोणती इमारत मागे आहे? पहिली की दुसरी; एकदा नीट क्लिक करून पाहा

mr_sharad_9527 and deep__sharu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नशीबवान आहे ती पोरगी तिच्या नशिबी असा कट्टर शिवभक्त व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बद्दल आदर असणारा एक मावळा भेटला” तर एका युजरने लिहिलेय, “मानलं भाऊ … शिवाजी महाराजांचा खरा शिवभक्त तुच आहेस…जय जिजाऊ .. जय शिवराय.. जय शंभुराजे ..” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे लग्न बघून डोळ्यांत पाणी आलं” शिवगर्जना सुरू असताना खाली बसलेल्या लोकांवर अनेक युजर्सनी टिका केली आहे.