Viral Video : उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. कोणतेही शुभ कार्य असो, किंवा लग्न असो किंवा हळदी कुंकूचा कार्यक्रम, उखाणे हे आवर्जून विचारले जातात. लबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे, यालाच उखाणा म्हणतात. पूर्वी फक्त महिलाच उखाणा घ्यायच्या पण आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने उखाणा घेतात. उखाण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही उखाण्याचे व्हिडीओ मजेशीर असतात की पाहून पोट धरून हसायला येते.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क नवरदेव नवरीसाठी उखाणा घेत आहे. नवरदेवाचा उखाणा ऐकून कोणीही थक्क होईल. (a groom said funny ukhana for his wife)

हा व्हायरल व्हिडीओ गृहप्रवेशाच्या वेळीचा आहे. व्हिडीओमध्ये नवरदेव पत्नीसाठी उखाणा घेताना दिसत आहे. नवविवाहित जोडप्याच्या आजुबाजूला नातेवाईक सुद्धा जमलेले दिसत आहे. नवरदेव उखाणा घेतो, “जिम करणारी बायको मिळाली, डाएटचं आता टेन्शन मिटलं, आम्ही खाणार प्रोटीन आणि पनीर, बाकीच्यांनी खावं भाकरी आणि पिठलं” हा उखाणा ऐकून नवरीला हसू आवरत नाही आणि तिच्याबरोबर नातेवाईक सुद्धा हसताना दिसतात. जीमप्रेमी लोकांना हा व्हिडीओ खूप आवडेल.

हेही वाचा : VIDEO : “आई आहे म्हणून माहेर आहे” व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवतील आईबरोबरचे सुंदर क्षण

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : माणुसकी मेली! हेड कॉन्स्टेबल उष्माघाताने पडला बेशुद्ध: पण सब-इन्स्पेक्टर बनवत राहिला Video; कालांतराने झाला मृत्यू

i_nikkidalvi03 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “उखाणा”. या व्हिडीओवर काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत तर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी नवरदेवावर टीका सुद्धा केली आहे. एका युजरने लिहिलेय, “भाऊ भाकरी आणि पिठलं पण छान आहे. हेल्दी आहे” तर एका युजरने लिहिलेय, “उखाणा ठीके… पण पिठलं मधलं प्रोटीन आणि भाकरी मधलं कर्बोदके आणि फायबर बघून घ्या. आणखी एका युजरने लिहिलेय, “भाकरीमध्ये किती ताकद आहे तुला माहित नाही अजून भाकरी मध्ये..” यावर नवरदेवाने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिलेय, “Relax.. भाकरी आणि पिठलं हे नेहमी बेस्ट. हा फक्त उखाणा आहे आणि कोणत्याही प्रकारे आम्ही कमी लेखत नाही. गाडी मधून उतरून मांडवात येताना अचानक आठवलं की आता उखाणा घ्यावा लागेल तेव्हा लगेच हा उखाणा तयार केला. चूकभूल माफ.”