Viral Video: माणूस आणि प्राणी यांचे नाते खूप खास आहे. पण, दोघांमध्ये खूप फरक आहे. प्राण्यांमध्ये स्वार्थाची भावना नसते, तर माणूस कधी कधी स्वार्थापोटी आपल्याच माणसांचा पाय खेचताना दिसतो. पण, काही जण याला अपवाद असतात. जगात असे अनेक लोक आहेत जे केवळ प्रेमापोटी प्राण्यांना, माणसांना मदत करतात. त्यामागे त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये करुणा आणि शौर्याचे अविश्वसनीय प्रदर्शन दाखवत जलाशयात अडकलेल्या श्वानाला वाचवण्यासाठी एका पुरुषांच्या ग्रुपने साखळी तयार केली आहे आणि सुखरूप त्याला बाहेर काढले आहे.

व्हायरल व्हिडीओ परदेशातला आहे. एका ब्रिजवर काही नागरिक उभे आहेत. या नागरिकांची नजर जलाशयात अडकलेल्या एका श्वानाकडे जाते. श्वान स्वतःला वाचवण्यासाठी त्या नागरिकांकडे आशेने पाहताना दिसत आहे. नागरिक उभ्या असलेल्या ब्रिज आणि श्वान अडलेल्या जलाशयाच्यामध्ये एक स्लोप असतो. या स्लोपवरून वर चढून येण्यास श्वानाला भीती वाटत असते. हे पाहून ब्रिजवर उभा असलेला पुरुषांचा एक ग्रुप योजना आखतो. पुरुषांचा ग्रुप श्वानाला कसा वाचवतो एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…VIDEO: धावत्या ट्राममध्ये ‘त्याने’ मैत्रिणीला केलं प्रपोज; पण प्रवाशांचे ‘हे’ हावभाव करतील तुम्हालाही थक्क; नक्की काय घडलं?

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, जलाशयात अडकलेल्या श्वानाला वाचवण्यासाठी पुरुषांचा ग्रुप एक साखळी तयार करतो. गटातील एका सदस्याने जलाशयाच्या तीव्र उतारावरून उतरून श्वानाला धरले व इतर सदस्य दोघांना सुखरूप वर घेऊन येण्यासाठी एक साखळी तयार करतात आणि दोघांना वर ओढताना दिसतायत. एकमेकांचे हात धरून स्लोपवर एका खाली एक उभं राहून, एकमेकांचा हात घट्ट धरून एक साखळी करून श्वानाची खास बचाव मोहीम केली; जी खरंच कौतुकास्पद आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @pubity या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून विविध कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “या जगात अजूनही काही चांगले लोक आहेत.” तर दुसरा म्हणतोय की, “जेव्हा आपण स्वतःहून मोठ्या गोष्टीसाठी एकत्र काम करतो, तेव्हा मानव काहीही करू शकतो.” तर तिसऱ्याने “जगाला अशा लोकांची गरज आहे, अशा लोकांमुळे माझा माणसांवर विश्वास आहे” आदी कमेंट व्हिडीओखाली केल्या आहेत.