Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणाऱ्या असतात. काही व्हिडीओ भावूक करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तब्बल अडीच वर्षानंतर लंडनहून परत आलेल्या मुलाने घरच्यांना भन्नाट सरप्राइज दिले आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (a guy returned after 2 and half year from london and enter at home as a unknown person)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण घरात शिरतो आणि सर्व अचंबित होतात. त्यानंतर त्याला एका खूर्चीवर बसायला सांगतात. या तरुणाने डोक्यावर पांढरी कॅप आणि चेहऱ्यावर मास्क घातलेले असते. त्यामुळे त्याचा चेहरा कोणालाच दिसत नाही. पण त्या घरातील तरुणीला जरा शंका येते आणि ती विचार करते की कोण असेल. त्यानंतर तो तरुण त्या तरुणीच्या वडिलाजवळ जातो आणि त्यांच्या शेजारी बसतो. तेव्हा त्या तरुणीला आणखी शंका येते. ती धावत येते आणि त्याच्या चेहऱ्यावरचे मास्क काढते. चक्क तिचा भाऊ तिच्यासमोर असतो. आपला मुलगा घरी आलेला पाहून आई आणि बाबा खूप भावूक होतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा असतो. तब्बल अडीच वर्षानंतर मुलगा लंडनहून घरी परत येतो. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.

हेही वाचा : Vat Purnima 2024 : “खुळं काळीज हे माझं, तुला दिलं मी आंदण…” वटपौर्णिमेनिमित्त तुमच्या अहोंसाठी खास उखाणे, पाहा लिस्ट

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : सीट्सवर पाय अन् मोबाईल बॅटरी ऑन…; थिएटरमध्ये प्रेक्षकांनी असे काही केले की, VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप; म्हणाले…

sid_dhu.18 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”लंडनहून भारतात, सरप्राईज भेट अडीच वर्षानंतर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर आनंद आल्याशिवाय राहणार नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “खरंच व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी आले.” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप भावनिक क्षण होता.” हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्स भावूक झाले आहे तर काही यूजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.