Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी नव नवीन गोष्टी व्हायरल होत असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. कधी कोणी हटके जुगाड सांगतो तर कधी कोणी धक्कादायक स्टंट करताना दिसतो.हल्ली एक नवीन प्रकार सोशल मीडियावर पाहायला मिळतो. काही तरुण मुले हातात भन्नाट संदेश लिहिलेले पोस्टर हातात घेऊन भर रस्त्यात उभे असतात. तुम्ही असे व्हिडिओ पाहिले आहे का?

सध्या असाचवेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण हातात पोस्टर घेऊन भर रस्त्यात उभा आहे. त्याने पोस्टरवर असे काही मजेशीर लिहिलेय की पाहून रस्त्यावरील लोक पोट धरून हसताना दिसत आहे. (a guy stood with a funny poster in his hand and wrote how the wife would start to love you video went viral on social media)

हेही वाचा : ‘शिकार करो या शिकार बनो’ मृत्यूच्या दारात अडकलेल्या पिल्लाला वाचविण्यासाठी आईने केला सिंहिणीचा मोठा गेम, पाहा Video

काय लिहिलेय पोस्टरवर?

या वायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला रस्त्यावरील लोक पोस्टर कडे बघून हसताना दिसत असेल. पोस्टर बघून काही महिला पोट धरून हसताना दिसत आहे तर काही लोक या पोस्टरचे फोटो काढताना दिसत आहे. तरुण मंडळी, येणारे जाणारे प्रत्येकाला या पोस्टर कडे बघून हसू आवरत नाही. व्हिडिओ च्या शेवटी तुम्हाला एक तरुण हातात पोस्टर घेऊन उभा दिसेल. त्या पोस्टरवर लिहिलेय, “सासरवाडीवर प्रेम करा, बायको आपोआप तुमच्यावर प्रेम करेल”

पाहा व्हायरल व्हिडीओ

swapya__001 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सासरवाडीवर प्रेम करा,बायको आपोआप तुमच्यावर प्रेम करेल…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कुठून आणतो भावा एवढं टेलेंट” तर एका युजरने लिहिलेय, “कुठून येतात हे लोक, खूप छान”

हेही वाचा : ‘याला म्हणतात खरी माणुसकी…’ शेळ्यांसाठी मालकिणीने शिवला रेनकोट; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “भोळी माणसं फक्त गावाकडे…”

स्वप्नील सोळंके या तरुणाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ संभाजीनगर येथील आहे. हा तरुण अनेकदा शहराच्या विविध भागात भन्नाट मेसेज लिहिलेले पोस्टर हातात घेऊन रस्त्यावर उभा राहतो आणि लोकांच्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यामध्ये कैद करतो.