scorecardresearch

कयाकिंगला गेलेल्या व्यक्तीने टिपला नदीत पोहणाऱ्या हरणांचा कळप; मोहक दृश्य दाखवणारा व्हिडीओ व्हायरल

थोड्या काळासाठी पोहल्यानंतर, हरीणाला पाण्यात काही तरी धोकादायक असल्याचं जाणवताच ते बाहेर येतात.

beer swming
हा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे (फोटो:ViralHog/ YouTube)

फ्लोरिडा या नदीत कयाकिंगला गेलेल्या एका व्यक्तीने नदीत पोहणाऱ्या हरणांचा कळपाचा हा आकर्षक व्हिडीओ टिपला आहे. व्हिडीओमध्ये हरणांचा कळप नदीत पोहताना दिसत आहे. हे मोहक दृश्य आपल्याला व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघायला भाग पडतो.

शांत परिसर आणि नदीचे प्राचीन पाणी दाखववत व्हिडीओ सुरु होतो. काही सेकंदांनंतर, हरीणं वेगवेगळ्या दिशेने पाण्याच्या प्रवाहात प्रवेश करताना दिसतात. थोड्या काळासाठी पोहल्यानंतर, हरीणाला पाण्यात काही तरी धोकादायक असल्याचं जाणवताच ते घाबरून, घाईघाईने नदीतून माघार घेण्यास सुरुवात करतात. ते घाबरून परत येत असताना ज्या पद्धतीने पाणी उडते आणि त्यावर सूर्यप्रकाश पडताना दिसतो हे बघण्यासारखे आहे. ज्या प्रकारे ते पाण्यातून बाहेर येताना विशाल झेप घेतात ते अतिशय आकर्षक वाटते.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल हॉग या युट्युब चॅनेलने हा व्हिडीओ ७ ऑगस्ट २०२० रोजी पोस्ट केला होता. आता १ वर्षानंतर हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.काही हजार लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-10-2021 at 10:53 IST

संबंधित बातम्या