साप हा एक असा जीव आहे ज्याची सर्वांनाच भीती वाटते. त्यामागे कारणही तसंच आहे. साप हा जगातील धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे, कारण तो विषारी आहे. तसे तर साप हे जंगलात असतात, पण गेल्या काहीकाळापासून लोकांच्या घरात, गाड्यांमध्ये, सोसायट्यांमध्येही साप दिसायला लागले आहेत. हे साप दिसले की लोक घाबरतात आणि सर्पमित्रांना बोलावतात. अनेकदा हे साप अशा ठिकाणी लपून बसतात की कोणाला शंकाही येत नाही. कुठुनही ते येतात, अशीच एक घटना ठाण्यामध्ये घडली आहे, ठाण्यात एका इमारतीतील घरात सापानं चक्क किचनमधून प्रवेश केलाय. हा भलामोठा साप पाहून तुम्हालाही घाम फुटेल..
या व्हिडीओमध्ये दोन माणसे सापाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एका फ्लॅटच्या खिडकीला संरक्षक लोखंडी जाळी लावलेली दिसते व त्यात एक विशाल अजगर लटकलेला आहे. व्हिडिओमध्ये, एक माणूस सापाच्या शेपटीने तर दुसरा सापाचे डोके धरून त्याला ग्रीलमधून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. सरतेशेवटी, अजगर जाळीवरील आपली पकड सोडतो आणि त्यावरून खाली पडतो. सध्या सोशल मीडियावर फिरत असलेली ही क्लिप ठाण्यातील असल्याचे दावे केले जात आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> हात बाहेर काढताच खांबाला धडकला; धावत्या ट्रेनमधून खाली पडला अन् थेट रुळाखाली गेला, अंगावर काटा आणणारा Video
व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. आता युझर्सनेही आपले घर तपासण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या पोस्टवर आता वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.