Viral Video : उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणतेही शुभ कार्य असो किंवा लग्न समारंभ उखाणा हा आवडीने घेतला जातो. लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेतले जाते, यालाच उखाणा म्हणतात. पूर्वी फक्त महिलाच उखाणा घ्यायच्या. आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने उखाणा घेताना दिसतात.

बदलत्या काळानुसार उखाणा घेण्याची पद्धत सुद्धा बदलली आहे. अनेक मजेशीर उखाणे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. काही उखाण्याचे व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येते. काही लोकं उखाण्यातून खोडी काढतात तर काही लोकं लव्हस्टोरी सांगतात. काही लोकं प्रेम व्यक्त करतात तर काही लोकं सिक्रेट सांगतात. सध्या असाच एक भन्नाट उखाणा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने मजेशीर उखाणा सांगितला आहे. या महिलेचा उखाणा ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल. या महिलेने उखाण्यातून एक मजेशीर सिक्रेट सांगितले आहे.

a girl cleaning shaved by sitting in salon
अरे देवा! सलुनमध्ये बसून चक्क दाढी करत होती तरुणी, VIDEO पाहून तुम्हीही चक्रावून जाल
How to remove Bad Smell From Dustbin with the help of five rupees
फक्त पाच रुपयांचा बेकिंग सोडा गायब करेन कचरापेटीतील दुर्गंधी, पाहा VIDEO
young boy jugaad video goes viral
एका तिकिटावर केली सर्व मित्रांनी यात्रेत एंट्री, तरुणाचा जुगाड पाहून डोकं धराल, व्हिडीओ होतोय व्हायरल
do you ever eat Wangi Bhaji
Viral Video : वांग्याची भजी कधी खाल्ली का? तरुण चालवतोय वांगी भजीचा स्टॉल, व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला उखाणा घेताना दिसतेय. तिच्या आजुबाजूला महिला उभ्या आहेत. ती उखाणा घेताना म्हणतेय, “मटणाचा रस्सा केला वाटून घाटून, विनायकराव काही आलेच नाही म्हणून मीच खाल्ला चाटून पुसून…” या महिलेचा हा भन्नाट उखाणा ऐकून तेथील इतर महिला सुद्धा जोरजोराने हसताना दिसतात. त्यातील एक महिला मजेशीरपणे म्हणते, “चोरी पकडली” हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. मटणप्रेमींना तर हा उखाणा खूप आवडेल.

हेही वाचा : याला म्हणतात खरं टॅलेंट! तीन वर्षाच्या चिमुकलीची बॅटिंग एकदा पाहाच, क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

ukhane_by_neha_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चाटून पुसून उखाणा.. उखाणा आवडला असेल तर मित्रमंडळींबरोबर नक्कीच शेयर करा” तुम्ही उखाणा नीट लक्ष देऊन ऐकला असेल तर तुम्हाला कळेल की या महिलेने विदर्भीय भाषेत हा उखाणा घेतला आहे. या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “शाकाहारी उखाणा घ्या वहिनी” तर एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय,”विनायकरावांना माहिती होते तुम्हाला पूरत नाही म्हणून ते आले नसतील” आणखी एका युजरने गमतीशीरपणे लिहिलेय, “मोये मोये” या व्हिडीओवर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.