आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात, ज्यांना लोकांना नाहक त्रास देण्यात आनंद मिळतो. तरुणांचा यात मुख्यतः समावेश असतो. मुलींची छेड काढणे, रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना त्रास देणे इत्यादींमध्ये ही मंडळी पुढे असतात. मात्र मध्यप्रदेशातील अशाच एका टोळीला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. जबलपूर येथील, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांच्या कानात खेळण्यातील भोंगे वाजवणाऱ्या टवाळ मुलांना पोलिसांच्या ‘जशास तसे’ कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच संपूर्ण देशात अतिशय धुमधडाक्यात नवरात्री आणि दसऱ्याचा सण साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी जत्रा, मेळावे इत्यादींचे आयोजनही करण्यात आले होते. जबलपूरमधील काही तरुण अशा जत्रांमध्ये मिळणारे खेळण्यातील भोंगे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या कानाजवळ वाजवून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या पठ्ठ्यांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

Viral Video : व्हिएतनामी फूड ब्लॉगरने पहिल्यांदाच चाखली पाणीपुरीची चव; रिअ‍ॅक्शन होतेय व्हायरल

कानाजवळ वाजवले जाणारे हे भोंगे किती त्रासदायक ठरू शकतात याची जाणीव करून देण्यासाठी पोलिसांनी या मुलांच्या कानात हे भोंगे वाजवले. तसेच त्यांनाही एकमेकांच्या कानात भोंगे वाजवण्यास सांगितले. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. शिवाय, शिक्षेचा भाग म्हणून पोलिसांनी त्यांना रस्त्यावरच उठा-बशा काढायला लावल्या.

एएनआय या वृत्तसंस्थेने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, खेळण्यातील भोंगे वाजवून इतरांना त्रास देणाऱ्या या टवाळ मुलांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच हे खेळण्यातील भोंगेही जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A lesson has been taught by the police to the youths who harass people by playing toy trumpets on the street video viral pvp
First published on: 07-10-2022 at 12:11 IST