सोशल मीडियावर रोज एका पेक्षा डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. गेल्या आठवड्यापासून एका जिल्हापरिषदेच्या शाळेतील चिमुकल्याचा लावणी डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. “मला प्रितीच्या झुल्यात झुलवा”, “कारभारी दमानं…” या गाण्यावर सुंदर लावणी सादर करणाऱ्या चिमुकल्याचा आता नवा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकल्याने पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर अप्रतिम लावणी सादर केली आहे. पुन्हा एकदा चिमुकल्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिमुकल्याच्या लावणीचा नवा व्हिडीओ चर्चेत

लावणी हा महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार आहे. एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण मोजकेच व्हिडिओ असतात जे प्रेक्षकांना आवतात. लावणी नृत्य वाटते तितके सोपे नाही पण हा चिमुकल्या कलाकराने अत्यंत सुंदर लावणी सादर केली आहे.

पाटलांचा बैलगाडा गाण्यावर थिरकला चिमुकला

पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा डान्सने लाखो प्रेक्षकांची जिंकले होते. आता गौतमी पाटीलला टक्कर देत या चिमुकल्याने ठसकेबाज लावणी सादर करून सर्वांचे मन जिंकले आहे. चिमुकला अत्यंत निरागसपणे नाचताना दिसत आहे. ढोलकीच्या तालावर तो गोंडसपणे कंबर थिरकवत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव इतके मोहक आहे की पाहताक्षणी सर्वजण त्याचे चाहते होत आहेत. गाण्याच्या तालावर त्याचे पाय अगदी अचूकपणे थिरकत आहे. नेटकऱ्यांना चिमुकल्याची लावणी खूप आवडली आहे. अनेकांनी कमेंट करून चिमुकल्याच्या लावणी नृत्याचे कौतुक केले आहे.

येथे पाहा व्हिडीओ

व्हिडिओ इंस्टाग्रामवर avi_kore__712 नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” पाटलांच्या गाड्याचा राडा नाय… ह्या पोराचा खरा राडा”

व्हिडीओवर कमेंट केली आहे एकाने कमेंट केली की, “ह्याच्या पुढे गौतमी फिक्की आहे”

दुसऱ्याने कमेंट केली की, एक नंबर डान्स,

तिसऱ्याने कमेंट केली की, “खूपच गोंडस आहे”

पाचव्याने कमेंट केली की, “किती नाचवता रे त्याला, पण भारी नाचतो”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A litil boy performed a lavani on the song patlancha bailgadanew video viral gautami patil snk