Viral Video : सध्या देशभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. सगळीकडे गणपतीच्या नावाचा जयजयकार केला जात आहे. ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. घरोघरी बाप्पाासाठी लाडू मोदक तयार केले जात आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण बाप्पााच्या उत्सवात सहभागी झाले आहे.

सोशल मीडियावर गणेशोत्सवाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली उकडीचे मोदक तयार करताना दिसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (a little child girl made a tasty ukdiche modak for Ganpati bappa)

Sarasbaug's viral video
Pune Video : सारसबागचं असं सौंदर्य तुम्ही कधीही पाहिलं नसेल! व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
a young boy sings rap in railway on Jalgaon boys
“अरे आम्ही जळगावची पोरं…” तरुणाचा रॅप चर्चेत, VIDEO होतोय व्हायरल
a young man making bhakari on chulha video viral
आईने शिकवलेली कला कधी उपाशी राहू देत नाही..! चुलीवर भाकरी बनवणाऱ्या तरुणाचा VIDEO VIRAL
How to Break a Wafer Packet: Viral Video Shows the Right Way
वेफर्सचे पॅकेट असे फोडावे, हे तुम्हाला वयाच्या कोणत्या वर्षी समजले?
pune video | Dhol Tasha Pathak Clears Road for Ambulance
Pune Video : ढोल ताशाचा गजर अन् एकच गर्दी! आपत्तीची चाहूल लागताच पथकाने रुग्णवाहिकेसाठी केला रस्ता मोकळा, व्हिडीओ व्हायरल
an old lady proposed his his old husband by giving rose
“शामराव डार्लिंग, आय लव्ह यू” गुलाबाचं फुल देऊन आजीने केलं आजोबांना भन्नाट प्रपोज, VIDEO एकदा पाहाच
balya dance traditional folk dance from kokan
Video : कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा विषय… बाल्या डान्स एकदा पाहाच, Video होतोय व्हायरल

चिमुकलीने बनवले बाप्पासाठी सुंदर मोदक

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकली मोदक भरताना दिसत आहे. ती उकडीचे मोदक तयार करत आहे. तिने खूप चांगल्या पद्धतीने मोदकामध्ये सारण भरले आहे आणि मोदकाला कळा पाडल्या आहेत. व्हिडीओत पुढे चिमुकली तिने तयार केलेला मोदक सर्वांना दाखवते. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “मूर्तीजवळ उभे राहून स्वतःला मालक समजू नका” कार्यकर्त्यानं रस्त्यावरच्या गरिबाला थेट लाथेनं उडवलं; VIDEO पाहून सांगा चूक कुणाची

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : Pune Video : पुण्यातील सर्वात सुंदर देखावा पाहिला का? साकारले पंजाबमधील सुंदर दुर्गियाना मंदिर, व्हिडीओ एकदा पाहाच

cutelittle_saanj या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सांज ने बनवले बाप्पासाठी मोदक” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “संस्कार ही अशी गोष्ट आहे किती पैसे असले तरी तुम्ही खरेदी करू शकत नाही आणि ते संस्कार फक्त रक्ताच्या नात्यातूनच मिळू शकतात ते रक्ताचे नातं म्हणजे आई वडील.” तर एका युजरने लिहिलेय, “किती छान केलाय ग मोदक… लाडूबाई….” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती सुंदर पद्धतीने तिने मोदक बनवलेत जशी काय खूप वर्षाचा अनुभव आहे आणि त्यात तिची ती खूप हलकीशी गोड स्माईल परत परत व्हिडीओ बघायला भाग पाडते. लव्ह यू बेटा. खूप मोठी हो.” अनेक युजर्सनी या चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही लोकांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.