बालपण देगा देवा हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल पण का म्हटले जाते याचा कधी विचार केला आहे का? बालपणात खरंच आयुष्याचं सुख दडलेले असते, कसलीही चिंता नाही, फक्त मज्जा मस्ती करायची. लहान मुलं ही अत्यंत निरागस असतात ते कोणत्याही गोष्टीचा मनापासून आनंद घेतात मग ते एखादा नवीन खेळ असो, नवीन गाणे असो किंवा डान्स. कोणतेही गोष्ट ते मनापासून करतात म्हणूनच कदाचित ते त्याचा आनंद घेऊ शकतात. सोशल मीडियावर लहान मुलांचे डान्सचे कित्येक व्हिडिओ व्हायरल होतात जे पाहून प्रत्येकाला पुन्हा लहान व्हावे, पुन्हा बालपण जगावे असे वाटते. सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जी आपल्याच धुंदीत नाचत आहे. तिला काही उत्तम डान्स येत नाही पण जमेल तसा ती प्रयत्न करते आहे आणि आनंदाने नाचत आहे. कोण काय म्हणले याची तिला अजिबात पर्वा नाही. याच निरागचपणामुळे तिचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
चिमुकलीचा आई नहीं गाण्यावर गोंडस डान्स
पश्चिम बंगालमधील एका लहान मुलीने श्रद्धा कपूरच्या स्त्री २ चित्रपटातील आई नहींवर गाण्यावर डान्स केला आहे. तिच्या उत्स्फूर्त नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांचे मन जिंकले आहेत. तोमादेर मेहू’ या इंस्टाग्राम वापरकर्त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील ती मुलगी आत्मविश्वासाने आई नहीं गाण्यावर नाचताना दिसते.
तिने श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या स्त्री २ मधील चार्टबस्टर गाण्याच्या हुक स्टेप्सचे स्वतःचे व्हर्जन तयार केले आहे. या क्लिपला आतापर्यंत ८ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कॅज्युअल पोशाख घालून आणि बिनधास्तपणे नाचणारी, ही चिमुकली फ्रीस्टाइल मूव्हजमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे आणि गाण्याच्या प्रत्येक तालावर ती ठुमकत आहे.
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री २’ या चार्टबस्टर चित्रपटातील हुक स्टेप्स तिने स्वतःच्या पद्धतीने सादर केल्या. या क्लिपला आतापर्यंत ८ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तिच्या चेहऱ्यावरील गोंडस हावभाव पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. सर्वांचे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे तिचा ठुमका.
हा पाहा Viral Video
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये तिच्या उर्जेबद्दल तिचे कौतुक केले.
“मी ठुमका बघूनच घायाळ झालो, खूप छान!” एका वापरकर्त्याने म्हटले, तर दुसऱ्याने म्हटले, “व्यावसायिक नर्तक देखील एकाच वेळी इतके डान्स स्टेप करत नाहीत.”
अनेक वापरकर्त्यांनी तिला “एक नवीन कलाकार” म्हटले, तर काहींनी तिचे भाव “अतुलनीय” असल्याचे म्हटले. काहींनी तिच्या आत्मविश्वासाचे आणि आनंदाचे कौतुकही केले.
हा व्हिडिओ कदाचित काही सेकंदांचा असेल, परंतु त्या लहान मुलीच्या कामगिरीने ऑनलाइनवर कायमचा ठसा उमटवला आहे.