लहान मुले जितकी गोंडस असतात तितकीच धडपडी असतात. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे लागते. जरा नजर हटेपर्यंत ते काहीतरी उद्योग करतात. घराबाहेर पडल्यानंतर तर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. रस्त्यावर वेगात धावणारी वाहणे किंवा कोणत्याच धोक्याकडे त्यांचे अजिबात लक्ष नसते अशावेळी पालकांनाच लक्ष ठेवावे लागते. अशाच एका प्रसंगाचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर सध्या एका थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायल होत आहे. मेक्सिकोमधील एका रस्त्यावर घडलेल्या या घटनेत एका दुकानदाराच्या प्रसंगावधानाने चिमुकल्या मुलीचा जीव वाचला आहे. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, युझर्स या दुकानदाराच्या तत्परतेचे जोरदार कौतुक करत आहेत.

काय घडले नेमके? (What Exactly Happened?)

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती आपल्या दुकानाबाहेर कामात व्यस्त होती. त्याच वेळी एक लहान मुलगी अचानक धावत रहदारीच्या रस्त्याच्या दिशेने धावताना दिसते. रस्त्यावरून सुसाट गाड्या येत असल्याचे पाहताच दुकानदाराचे लक्ष तिच्याकडे गेले. त्याच्याकडे विचार करायला काही सेकंदांचाही वेळ नव्हता. मुलीला वाचवण्यासाठी एक महिलाही तिच्या मागे धावली, मात्र घाईघाईत तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून या दुकानदाराने क्षणार्धात धाव घेतली.

ऐनवेळी देवदूत बनून आला दुकानदार (Shopkeeper Became a Savior Just in Time)

समोरून सुसाट वेगाने एक कार येत होती.ती कार चिमुकलीला धडक मारेल असे वाटत होते. कार चालकाने ब्रेक दाबेपर्यंत या दुकानदाराने मुलीला पकडून रस्त्याच्या कडेला खेचले. या बचावकार्यात दोघेही रस्त्यावर पडले, मात्र दुकानदाराने क्षणाचाही विलंब न लावता मुलीला सुरक्षितपणे त्या महिलेच्या स्वाधीन केले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला थरार (The Thrill Captured on CCTV Camera)

ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद झाली आहे. मुलीचा जीव वाचवल्यानंतर हा व्यक्ती अत्यंत शांतपणे पुन्हा आपल्या कामाला लागला. त्याने दाखवलेल्या अद्भूत प्रसंगावधानाचा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला असून नेटकऱ्यांनी दुकानदाराचे कौतुक केले आहे.