Viral video: “डोक्यावर तुळस, ओठांवर विठ्ठलाचं नाम आणि मनात पंढरीची ओढ.. विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करतात. महाराष्ट्रात सध्या आषाढी वारीचा सोहळा सुरू आहे. वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरपूरला जात आहेत. माऊलींच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. वारीची परंपरा ८०० वर्षांहून अधिक जुनी आहे. आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूवरून संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपुरात एकत्र येतात. हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव आहे. याचनिमित्त एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या डान्सचे तर अनेक व्हिडीओ या मंचावर शेअर केले जातात. सध्या एका चिमुकल्याचा असाच एक डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर लहान मुलांचे डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही चिमुकले इतके सुंदर डान्स करतात की त्यांचे कौतुक करावे तितके कमी असते. सध्या अशाच एका चिमुकलीचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा चिमुकलीनं सर्वांनाच वेड लावलंय.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओतील आन्या एकदमच मराठी मुलीच्या अवतारात दिसत आहे. “पंढरपुरात या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत” या गाण्यावर ती आत्मविश्वासाने नृत्य करत आहे.तिचा हा उत्साह आणि नृत्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. इतकी लहान मुलगी मोठ्या डान्सरना फिकी पाडू शकते, असे तिचे लटके, झटके नटखट मुरडणे देखणे दिसत आहे. चिमुकलीचे गाण्याच्या बीटवरील सोज्वळ आणि गोड हावभाव हे प्रत्येकाचं मन जिंकतात आणि एकदम भन्नाट डान्स करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो.
पाहा व्हिडीओ
या चिमुकलीचा डान्स, पेहराव आणि श्रृगांर पाहून तुम्हीही म्हणाल की हे अस्सल मराठी सौंदर्य आहे. सोशल मीडाियावर हा व्हिडीओ @reva_bokan_20 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.
