Viral video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या डान्सचे तर अनेक व्हिडीओ या मंचावर शेअर केले जातात. सध्या एका चिमुकल्याचा असाच एक मजेदार आणि मूड फ्रेश करणारा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर लहान मुलांचे डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही चिमुकले इतके सुंदर डान्स करतात की त्यांचे कौतुक करावे तितके कमी असते. सध्या अशाच एका चिमुकलीचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा चिमुकलीनं सर्वांनाच वेड लावलंय.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओतील आन्या एकदमच मराठी मुलीच्या अवतारात दिसत आहे. ट्रेंडिंग मराठी ट्रॅक ‘सुंदरी-सुंदरी’ या गाण्यावर ती आत्मविश्वासाने नृत्य करत आहे.तिचा हा उत्साह आणि नृत्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. इतकी लहान मुलगी मोठ्या डान्सरना फिकी पाडू शकते, असे तिचे लटके, झटके नटखट मुरडणे देखणे दिसत आहे. चिमुकलीचे गाण्याच्या बीटवरील सोज्वळ आणि गोड हावभाव हे प्रत्येकाचं मन जिंकतात आणि एकदम भन्नाट डान्स करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो.

पाहा व्हिडीओ

आन्या ही इंस्टाग्रामवर @adorable_aanyaa या अकाऊंटने प्रसिद्ध आहे.तिच्या अलिकडच्या व्हिडीओच्या लोकप्रियतेचा अंदाज तु्म्ही यावरुन लावू शकता की आतापर्यंत या व्हिडीओला २.६ कोटीहून जास्त व्यूज मिळालेले आहेत. आणि हा व्हिडीओ २१ लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स केला आहे. व्हिडीओ शेअर करताना आन्या हीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की या लुकमध्ये मराठी मुलीचा स्वॅग कसा आहे ? यावर चाहत्यांच्या प्रतिक्रीयांचा पाऊस पडला आहे. कोणी तिला लाडाने छोटा पॅकेट, मोठा धमका ! तर अनेकजण तिच्या या नखऱ्याने हैराण झाले आहेत.

केवळ ६ वर्षांच्या आन्या हीने कोणत्याही डान्स अकादमीतून शिक्षण घेतलेले नाही. तिच्या मेहनत आणि डान्स शिकण्याच्या इच्छेमुळे ती घरीच नृत्य शिकली आहे.तिचे इंस्टाग्रामवर १८ लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. तिचे पालक जिम्मी आणि राहुल पटेल हे अकाऊंट हँडल करतात. आन्या हीने अनेक बॉलीवूडच्या हस्तींसोबत देखील स्टेज परफॉर्म केलेला आहे. नोरा फतेही आणि भव्य गांधी सोबत तिने स्टेज शेअर केला आहे.