School Life Viral Video : शाळेचे दिवस हे आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असतात. शाळेतील मित्र, शिक्षक आणि काही मजेशीर गोष्टी नेहमी आठवतात. वर्गखोली, मैदान आणि प्रार्थना या ठिकाणी आपल्या आठवणी जोडलेल्या असतात. सोशल मीडियावर शाळेतील अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ पाहून आपणही आपल्या शाळेच्या दिवसात रमतो आणि आपल्याला शाळेचे दिवस आठवतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली प्रार्थना म्हणताना लॉलीपॉप खाताना दिसत आहे. हा गोंडस विद्यार्थीनीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (a little student eating Lollipop while standing for prayer at school funny video)

हेही वाचा : “गण्याच्या वडिलांना तीन मुले; एकाचे नाव मे, दुसऱ्याचे नाव जून तर तिसऱ्याचे नाव काय?” तुम्ही सोडवू शकता का हे कोडे ? पाहा व्हायरल VIDEO

प्रार्थना सुरू असताना लॉलीपॉप खात होती चिमुकली, VIDEO पाहून पोट धरून हसाल

आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी लॉलीपॉप खाल्ले असेल. काही लोकांना अजुनही लॉलीपॉप प्रचंड आवडत असेल. लॉलीपॉप आवडणाऱ्या सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली प्रार्थना सुरू असताना लॉलीपॉप खाताना दिसते. ती लॉलीपॉप खात हात जोडून प्रार्थना म्हणताना दिसते. “इतनी शक्ति हमें देना दाता..” ही लोकप्रिय प्रार्थना म्हणताना दिसते.

तिच्या शेजारी उभे असलेले इतर विद्यार्थी सुद्धा ही प्रार्थना म्हणताना दिसतात. चिमुकली तोंडात लॉलीपॉप धरून आणि डोळे बंद करून खूप मनापासून प्रार्थना म्हणताना दिसते. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (VIRAL VIDEO)

swpnil3792 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लॉलीपॉप लव्ह ऑफ किड्स” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बच्चे मन के सच्चे” तर एका युजरने लिहिलेय, “काहीही होऊ द्या, लॉलीपॉप खाणे महत्त्वाचे…”

हेही वाचा : ट्रेन दुसरी मिळेल पण जीव नाही! धावत्या ट्रेनमध्ये मुलासह महिलेला चढवण्याचा प्रयत्न, नंतर ज्याची भीती तेच झालं, पाहा VIDEO

आणखी एका युजरने लिहिलेय, “लॉलीपॉप खाणे थांबवू नको” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.