Viral Video : शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. शाळेच्या आठवणी आजही आठवणी आजही मनाच्या कोपर्‍यात जिवंत असतात. शाळा, शाळेचे दिवस, वर्ग खोली, वर्गशिक्षक, शाळेचे मित्र आणि मजेशीर किस्से नेहमी आपण कधीही विसरू शकत नाही. सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा आपल्याला शाळेचे दिवस आठवतात.

सध्या असाच एका शाळकरी चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की जेव्हा शिक्षक त्याला गृहपाठ विचारतात, तेव्हा तो असे काही उत्तर देतो की तुम्हालाही हसू आवरणार नाही. शाळेतील मुले खरंच निरागस व प्रामाणिक असतात, असे तुम्हाला वाटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

sebi fined rs 650 crore to 22 companies including anil ambani part 2
अबब भयंकर शिक्षा ! (भाग २)
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
a boy can not swim but jumped into the well as a friend said
पोहता येत नव्हते पण मित्र म्हणाला म्हणून विहिरीत उडी मारली; चिमुकल्याचा मैत्रीवरचा विश्वास, VIDEO होतोय व्हायरल
a teacher danced with student so gracefully
VIDEO : शिक्षकाने केला विद्यार्थ्याबरोबर जबरदस्त डान्स, स्टेप्स अन् हावभाव पाहून व्हाल थक्क! व्हिडीओ होतोय व्हायरल
Live in relationship
“लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सज्ञान जोडप्यांना संरक्षण दिलं पाहिजे, मग ते विवाहित असले तरीही”, उच्च न्यायालयाचे निरीक्षण
Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: आर्यन मिश्राला गोरक्षकांनी गोळ्या झाडून मारलं; वडील म्हणाले, “आम्ही पंडित आहोत…”
morality Act to impose restrictions on women by the Taliban government of Afghanistan
संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख… मोठ्या आवाजात बोलणे नाही, गाणी नाही… महिलांसाठी अफगाण नैतिकता कायद्यातील अजब तरतुदी! 

हेही वाचा : मस्ती नव्हे दोस्ती…! मालकाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव पणाला; स्विमिंग पूलमध्ये श्वानाने घेतली उडी अन्… पाहा हृदयस्पर्शी VIRAL VIDEO

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक वर्गखोली दिसेल. या वर्गखोलीमध्ये चिमुकले विद्यार्थी बाकावर बसलेले दिसत आहे. वह्या पुस्तके समोर ठेवून अभ्यास करताना दिसत आहे. तितक्यात एक शिक्षक येतात आणि एका विद्यार्थ्याला गृहपाठाविषयी विचारतात. शिक्षक विचारतात, “गृहपाठ कुठे आहे? डायग्राम कुठे आहे?” त्यावर विद्यार्थी म्हणतो, “पप्पाला काढायला येत नाही.” त्यावर शिक्षक म्हणतात, “गृहपाठ कोणाला दिले होते. तुला दिले होते की पप्पाला दिले होते. अरे बाळा, तुला दिले होते.” या व्हिडीओवर लिहिलेय, “प्रामाणिकपणा”. शाळेतील अनेक मजेशीर व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एवढा प्रामाणिकपणा शाळेतील निरागस विद्यार्थ्यांमध्येच दिसू शकतो, असे तुम्हाला वाटेल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Vinod Kambli : विनोद कांबळीची अवस्था पाहून नेटीझन्सची सचिन तेंडुलकरला हाक, उभंही राहता येत नसल्याचा VIDEO पाहून चाहते हळहळले

tushar.godse007 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जी आहे ती कारणे….असा प्रामाणिकपणा शाळेतच पहायला मिळतो”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आता पप्पालाच शाळेत पाठव” तर एका युजरने लिहिलेय, “किती निष्पाप चिमुकला आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आता होमवर्क पप्पालाच करावा लागतोय.” एक युजर लिहितो, “खूप छान, लहान मुले किती निरागस असतात.” तर दुसरा युजर लिहितो, “हीच ती निरागसता जी आपण शिक्षक रोज अनुभवत असतोय”