Viral Video : शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. शाळेच्या आठवणी आजही आठवणी आजही मनाच्या कोपर्यात जिवंत असतात. शाळा, शाळेचे दिवस, वर्ग खोली, वर्गशिक्षक, शाळेचे मित्र आणि मजेशीर किस्से नेहमी आपण कधीही विसरू शकत नाही. सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा आपल्याला शाळेचे दिवस आठवतात. सध्या असाच एका शाळकरी चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की जेव्हा शिक्षक त्याला गृहपाठ विचारतात, तेव्हा तो असे काही उत्तर देतो की तुम्हालाही हसू आवरणार नाही. शाळेतील मुले खरंच निरागस व प्रामाणिक असतात, असे तुम्हाला वाटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हेही वाचा : मस्ती नव्हे दोस्ती…! मालकाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव पणाला; स्विमिंग पूलमध्ये श्वानाने घेतली उडी अन्… पाहा हृदयस्पर्शी VIRAL VIDEO या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक वर्गखोली दिसेल. या वर्गखोलीमध्ये चिमुकले विद्यार्थी बाकावर बसलेले दिसत आहे. वह्या पुस्तके समोर ठेवून अभ्यास करताना दिसत आहे. तितक्यात एक शिक्षक येतात आणि एका विद्यार्थ्याला गृहपाठाविषयी विचारतात. शिक्षक विचारतात, "गृहपाठ कुठे आहे? डायग्राम कुठे आहे?" त्यावर विद्यार्थी म्हणतो, "पप्पाला काढायला येत नाही." त्यावर शिक्षक म्हणतात, "गृहपाठ कोणाला दिले होते. तुला दिले होते की पप्पाला दिले होते. अरे बाळा, तुला दिले होते." या व्हिडीओवर लिहिलेय, "प्रामाणिकपणा". शाळेतील अनेक मजेशीर व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एवढा प्रामाणिकपणा शाळेतील निरागस विद्यार्थ्यांमध्येच दिसू शकतो, असे तुम्हाला वाटेल. पाहा व्हायरल व्हिडीओ हेही वाचा : Vinod Kambli : विनोद कांबळीची अवस्था पाहून नेटीझन्सची सचिन तेंडुलकरला हाक, उभंही राहता येत नसल्याचा VIDEO पाहून चाहते हळहळले tushar.godse007 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, "जी आहे ती कारणे….असा प्रामाणिकपणा शाळेतच पहायला मिळतो"या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, "आता पप्पालाच शाळेत पाठव" तर एका युजरने लिहिलेय, "किती निष्पाप चिमुकला आहे." आणखी एका युजरने लिहिलेय, "आता होमवर्क पप्पालाच करावा लागतोय." एक युजर लिहितो, "खूप छान, लहान मुले किती निरागस असतात." तर दुसरा युजर लिहितो, "हीच ती निरागसता जी आपण शिक्षक रोज अनुभवत असतोय"