A man faked his death for a reel in UP: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय. अनेकांना जणू या सोशल मीडियाचं व्यसनच लागलंय. काही लाइक्स, कमेंट्ससाठी लोक स्वत:च्या जीवाशी खेळायलाही मागे-पुढे पाहत नाहीत, अशी सध्याची परिस्थिती आहे. फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार आहेत.

भररस्त्यात गाड्यांच्या मधोमध डान्स करणं, सार्वजनिक ठिकाणी लोकांना त्रास होईल अशा प्रकारे रील्स शूट करणं असे अनेक किस्से आपण ऐकतच असतो. पण, अलीकडेच एक असा विचित्र प्रकार घडला आहे, जो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

Teacher running towards classroom to resolve fight students gave surprise viral video
विद्यार्थ्यांची मारामारी होताच वर्गात धावत गेली शिक्षिका अन्…, पुढे घडलं काही भलतंच, पाहा VIRAL VIDEO
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Kidnapping Case Fact Check Video in marathi
लिफ्टमध्ये शिरले मुलींच्या तोंडावर रुमाल दाबला अन् केले अपहरण; Video खरा; पण नेमका कुठला? जाणून घ्या सत्य

हेही वाचा… बाप्पाच्या विसर्जनाची अनोखी पद्धत! माणसाने गणरायाच्या मूर्तीसह विहिरीत मारली उडी अन्…, VIDEO पाहून व्हाल अवाक

काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक माणसानं भररस्त्यात चक्क मरणाचं सोंग घेतल्याचं दिसतंय. नेमकं या व्हिडीओत काय घडलं ते आपण जाणून घेऊ.

व्हायरल व्हिडीओ

एका विचित्र घटनेत एका व्यक्तीनं सोशल मीडियावर रील शूट करण्यासाठी चक्क स्वत: मेल्याचं वातावरण निर्माण केलं. उत्तर प्रदेशातील एका रस्त्याच्या मधोमध एका व्यक्तीनं स्वत:चा मृत्यू झालाय, असं भासवून रस्त्याच्या मधोमध मृतदेहाप्रमाणे पडून राहिला. मृतदेहाचं नाटक करणाऱ्या या तरुणाच्या अंगावर एक पांढरी बेडशीट होती, तसंच त्याच्या नाकपुड्यांत कापसाचे बोळे आणि गळ्यात फुलांचा हार होता. अगदी खऱ्याखुऱ्या मृतदेहासारखं सोंग त्यानं घेतलं होतं.

रस्त्यात अनोळखी मृतदेह पडला असल्याचे पाहून हळूहळू तिथे गर्दी जमा झाली आणि हा मृतदेह नेमका कोणाचा, या प्रश्नानं तिथे जमलेल्या अनेकांना घेरलं. तेवढ्यात अचानक मृत झाल्याचं भासवणारा तो तरुण पडून राहिलेल्या जागेवरून उठला आणि हसायला लागला. हे पाहून आजूबाजूला जमलेल्या लोकांना धक्काच बसला.

हेही वाचा… “मॅडम तुम्ही…”, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षिकेने केला डान्स; VIDEO VIRAL होताच नेटकरी म्हणाले…

रील निर्मात्याला अटक

ही घटना राज्याच्या कासगंज परिसरातून समोर आली आणि त्या व्यक्तीचे नाव मुकेश कुमार असे आहे. कुमारला त्याच्या कृत्याबद्दल स्थानिक पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.

हेही वाचा… “काका एकदम खतरनाक…”, बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणूकीत काकांनी धरला जबरदस्त ठेका; Video पाहून नेटकरी म्हणाले…

श्री. राजेश भारती, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, युवकाने मृत झाल्याचे भासवल्याची घटना उत्तर प्रदेशातील कासगंज येथील राज कोल्ड स्टोरेज परिसरात घडली, जिथे फक्त एका रीलसाठी रस्त्यावर विश्रांती घेतलेल्या एका तरुणाने उघडपणे त्याचा खोटा मृत्यू दाखवण्याचा प्रयत्न केला.