VIDEO : सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटींची नक्कल करणाऱ्या अनेक युजर्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही लोकं तर अगदी बॉलिवूड सेलिब्रिटींसारखे दिसण्यासाठी वाट्टेल ते करतात. सेम टू सेम अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासारखा दिसणाऱ्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की हे अभिनेते मिथुन चक्रवर्ती आहेत का? या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला क्षणभरासाठी तरुणपणीचे मिथुन चक्रवर्ती दिसतील. नंतर तुमच्या लक्षात येईल की हा व्यक्ती एक कलाकार आहे, जो हुबेहूब मिथुन चक्रवर्तींसारखा दिसतो. या व्हिडीओत ते मिथुन चक्रवर्तींच्या आवाजावर डायलॉग म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कोण आहे ही व्यक्ती? सेम टू सेम मिथुन चक्रवर्ती यांच्यासारखा दिसणाऱ्या या व्यक्तीचे नाव राहुल चौगुले आहे. ते मिथुन चक्रवर्ती यांचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांच्या jrmithun या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ते मिथुन चक्रवर्तींसारखा लूक करून व्हिडीओ शेअर करत असतात. मिथुन चक्रवर्तींचे डायलॉग ते हुबेहूब त्यांच्या अंदाजात म्हणतात.त्यांचा चेहरा थोडा फार मिथुन चक्रवर्तींसारखा दिसतो, त्यामुळे नेटकरीही त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत असतात. हेही वाचा : ६५ वर्षांच्या आजीची माधुरी दीक्षितला टक्कर! बॉलीवूड गाण्यांवर करतात तुफान डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल घायाळ मिथुन चक्रवर्ती हे बॉलिवूडचे नामवंत अभिनेते आहेत. डिस्को डान्सर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये साडे तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आजही त्यांचे अनेक चाहते सोशल मीडियावर त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त करत असतात.