सोशल मीडियावर मेट्रो स्टेशनवरील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मेट्रो स्थानकावर एका माथेफिरुने महिलेला ट्रेन येत असताना रुळावर ढकलल्याचं दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. बेल्जियमची राजधानी रॉजियर मेट्रो स्टेशनवर शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली, आरटी या न्यूज वेबसाइटनुसार, सुदैवाने मोटरमनने ट्रेन वेळेवर थांबल्याने महिलेला काहीही झालं नाही. हृदयाचे ठोके वाढवणारा हा व्हिडिओ अनेक जण वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माथेफिरू पुरुष महिलेला ट्रेनसमोर ढकलण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवरून अस्वस्थपणे चालताना दिसत आहे. मेट्रो जवळ येताच तो पुढे धावत येतो आणि महिलेला रुळांवर ढकलतो. रेल्वे चालकाने त्वरीत ब्रेक दाबल्याने महिलेचा जीव वाचला. तेव्हा तिची मदत करण्यासाठी जवळचे लोक धावून आले. महिला आणि मेट्रो चालक दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले.

ब्रुसेल्स इंटरकम्युनल ट्रान्सपोर्ट कंपनीचे प्रवक्ते गाय सॅब्लोन यांनी ब्रुसेल्स टाईम्सला सांगितले की, “मोटरमनने सतर्कता दाखवल्याने त्या महिलेचा जीव वाचला. मात्र पीडिताप्रमाणेच त्यालाही धक्का बसला आहे.” दरम्यान, महिलेला धक्काबुक्की करून गुन्हेगार पळून गेला होता. ब्रुसेल्सच्या सरकारी वकिलाच्या कार्यालयाने सांगितले की, त्याला लगेचच दुसऱ्या मेट्रो स्टेशनवर अटक करण्यात आली आणि त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. गुन्ह्यामागचं खरं कारण शोधण्यासाठी या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. त्यांची प्रकृती तपासण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A man pushed a woman in front of an oncoming train in brussels viral video rmt
First published on: 17-01-2022 at 13:34 IST