Viral Video : आपल्या देशात असंख्य लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत अनेक जण रेल्वेचा प्रवास सोयीस्कर समजतात. नोकरी, शिक्षण, व्यवसाय करणारे दररोज रेल्वेने प्रवास करतात. अनेकदा धावपळीत वेळ चुकते आणि रेल्वे निघून जाते अशा वेळी पुढच्या रेल्वेची किंवा लोकलची वाट पाहावी लागते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक विक्रेता डोक्यावर वजनी सामान घेऊन रेल्वे पकडण्यासाठी धावत्या रेल्वेच्या मागे धावताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a man runs to catch running train by putting his life in danger video goes viral on social media)

धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावरून धावला

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक विक्रेता प्लॅटफॉर्मवरून रेल्वे ट्रॅकवर उडी मारताना दिसेल. डोक्यावर वजनी सामान धरून हा विक्रेता एका रेल्वे ट्रॅकवरून दुसऱ्या रेल्वे ट्रॅकवर जातो आणि धावत्या रेल्वेला पकडण्याचा प्रयत्न करतो. एका हाताने डोक्यावरील सामान पकडून तो मोठ्या हुशारीने धावत्या रेल्वेच्या डब्यात चढताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. हा विक्रेता जबाबदारीमुळे धावत्या रेल्वेच्या मागे धावताना दिसतो पण त्यासाठी जीव धोक्यात टाकणे खूप चुकीचे आहे. अनेकदा आयुष्यात जबाबदारीमुळे पैसा कमावणे खूप महत्त्वाचे असते पण त्यासाठी एकदा मिळालेलं आयुष्य धोक्यात टाकू नये.

Train accident young woman train accident while crossing the railway track brutal accident video viral on social media
बापरे! तिच्या एका निर्णयामुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं; रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेन आली अन्…, तरुणीचा काळजात धडकी भरवणारा VIDEO व्हायरल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Shocking Stunt Video
VIDEO : लायटरबरोबर नको ती स्टंटबाजी! क्षणार्धात चेहऱ्याने घेतला पेट अन्…पुढे काय घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का
shocking video
Video : “जीव एवढा स्वस्त असतो का?” रिल बनवण्यासाठी तरुणीने केला उंच झाडाच्या शेंड्यावर चढून डान्स, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
india railway shocking video
“रेल्वे प्रशासनाचे याकडे लक्ष आहे का?” रेल्वे प्रॉपर्टीचा खुलेआमपणे सुरू आहे धक्कादायक वापर; पाहा VIDEO
Emotional video of father running behind train to earn money hardwork video viral
एका बापाची मजबुरी! प्लॅटफॉर्मवरून उडी मारली, ट्रेनच्या मागे धावत सुटला अन्…; ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
railway nir
“५ रुपयांसाठी एवढी मारहाण?”, एका चुकीमुळे पॅन्ट्री बॉयला मॅनेजरने धू धू धुतला, रेल्वेतील धक्कादायक Video Viral
Accident video viral where Speedy Bus hit the man shocking video on social media
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; बसने दिली धडक, टायरखाली येणार इतक्यात…, पुढच्याच क्षणी काय झालं पाहा

हेही वाचा : गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी १२ गाड्यांचा ताफा घेऊन निघाला गँगस्टर, Video Viral होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”

Pooja_1010 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “त्याच्यावर घराची जबाबदारी असती तर त्याने जीव धोक्यात घालून चालत्या ट्रेनच्या मागे धावला नसता. डोकं नसेल तर पगडी कुठे घालणार? ही जगातील शेवटची ट्रेन नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंय” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत ज्या व्हिडीओमध्ये लोक जीव धोक्यात टाकून रेल्वे पकडताना किंवा रेल्वेच्या डब्यात चढताना दिसतात.

Story img Loader