Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून चेहऱ्यावर हसू येते तर काही व्हिडीओ पाहून आपण भावूक होतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भर रस्त्यावर कष्टकरी माणूस गाणं गाताना दिसत आहे. त्याचा सुंदर आवाज ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्यक्तीनं गायलं सुरेख गाणं
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन कष्टकरी माणसं रस्त्याच्या कडेला उभी दिसेल. एका माणसाजवळ रिक्षा आहे तर एक माणूस खांद्यावर पोतं वाहून नेत आहे. खांद्यावर पोतं वाहून नेणारा माणूस अचानक गायला सुरू करतो आणि सुंदर गाणं गातो. ‘क्या हुआ तेरा वादा’ हे लोकप्रिय बॉलीवूड गाणं गाताना दिसतो. त्याने गायलेले गाण्याचे लिरीक्स ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. हा माणूस गाणं गाताना म्हणतो,
“क्या हुआ तेरा वादा, वो कसम, वो इरादा. ओ कहने वाले मुझको फ़रेबी
कौन फ़रेबी है ये बता
हो जिसने गम लिया, प्यार की खातिर
या जिसने प्यार को बेच दिया
नशा दौलत का ऐसा भी क्या”
रिक्षाचालक त्याचं हे सुंदर गाणं ऐकताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या माणसाचे चेहऱ्यावरील हावभाव आणि आवाज ऐकून कोणीही त्याचे चाहते होईल. हा व्हिडीओ हजरतगंज लखनऊ येथील आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
lucknowdiaries32 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लखनऊ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती टॅलेंटेड लोक आहेत आपल्या लखनऊमध्ये” तर एका युजरने लिहिलेय, “हे लखनऊ आहे आहे, येथे प्रत्येक जण नवाब आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “असं वाटतंय काकांची फसवणूक झाली आहे.” एक युजर लिहितो, “नशा दौलत का ऐसा भी क्या..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी या माणसाविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे.