scorecardresearch

बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेला अन्…; उत्तरप्रदेशातील ‘अजब प्रेम की गजब कहानी’

शाहजहांपूर जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीला भेटायला जाताना ओळख लपवण्यासाठी बुरखा घातला होता.

बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेला अन्…; उत्तरप्रदेशातील ‘अजब प्रेम की गजब कहानी’
या तरुणाने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी एक अजब शक्कल लढवली आहे. (प्रातिनिधिक फोटो : PTI)

काही लोक प्रेमासाठी काहीही करतात. प्रेम ही एक अशी भावना आहे जी प्रत्येकजण आयुष्याच्या एका टप्प्यावर अनुभवतो. आपल्यापैकी अनेकांनीही याचा अनुभव घेतला असेल. प्रेमामध्ये लोक सर्व बंधने तोडतात. आपण सहसा कधीही करणार नाही, अशा गोष्टीही आपण प्रेमात असताना करतो. अशीच एक गोष्ट उत्तरप्रदेशच्या पठ्ठ्याने केली आहे. या तरुणाने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी एक अजब शक्कल लढवली आहे.

शाहजहांपूर जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीला भेटायला जाताना ओळख लपवण्यासाठी बुरखा घातला होता. मात्र, काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे झाल्या नाहीत. परिणामी पोलिसांनी या तरुणाला अटक केले. सैफ अली असे या तरुणाचे नाव आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी म्हटलंय की लपण्यासाठी बुरख्याचा वापर केल्यामुळे या तरुणाविरुद्ध “शांतता भंग” केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जास्तीत जास्त दारू प्या, जपान सरकारचं नागरिकांना आवाहन, कारण जाणून वाटेल आश्चर्य

या तरुणाला त्याच्या घरापासून दूर असलेल्या ठिकाणी नोकरी मिळाली होती. त्यामुळे त्या ठिकाणी जाण्याआधी त्याला मेहमदपूर गावात राहणाऱ्या आपल्या प्रेयसीला भेटायचे होते. त्या परिसरातील लोक त्याला ओळखायचे. म्हणूनच आपली ओळख लपवण्यासाठी या पठ्ठ्याने बुरख्याचा आधार घ्यायचे ठरवले. मंगळवारी तो बुरखा घालून आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी दिली.

मात्र बुरख्यातील त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने स्थानिकांनी त्याला बुरखा काढायला सांगितले. जेव्हा त्यांना बुरख्यामध्ये पुरुष लपला आहे हे समजले, तेव्हा त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. एका स्थानिकाने या घटनेचा व्हिडीओही बनवला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘घेऊन टाक’ म्हणत ‘या’ अमेरिकी माणसाने धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका; Viral Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

गेल्या वर्षी, भदोही जिल्ह्यातील एक मुलगा वधूच्या वेषात, आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. विशेष म्हणजे त्या दिवशी त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्या मुलाबरोबर लग्न होणार होते. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी या मुलाला बेदम मारहाण केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या