Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नसतो. एखादा मजेशीर प्रसंग, प्राण्यांचा अनोखा व्हिडीओ, एखाद्या व्यक्तीचा सुंदर आवाज, भन्नाट डान्स, गाणे, अभिनय किंवा रोजच्या आयुष्यातील एखादी साधी पण वेगळी घटना काही क्षणांतच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेऊ शकते. विशेष म्हणजे, पूर्वी केवळ मोठ्या कलाकारांनाच आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळत असे; मात्र आता सोशल मीडियामुळे सामान्य व्यक्तीलाही आपली प्रतिभा लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातील महिला, तरुण, लहान मुले तसेच विविध क्षेत्रांतील कलाकार आपल्या कला आणि कौशल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. एखादा व्हिडीओ लोकांना आवडला, त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आणि शेअरिंग झाले की तो काही वेळातच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतो. त्यामुळे सोशल मीडिया हे मनोरंजनासोबतच अनेकांसाठी आपली ओळख निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे.
अनेक पर्यटनस्थळांवर माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. पर्यटकांच्या हातातील खाद्यपदार्थ किंवा वस्तू पाहून काही माकडे त्यांच्याजवळ येतात आणि कधी कधी वस्तू हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पर्यटकांना माकडांपासून सावध राहावे लागते.
अशा माकडांच्या मजेशीर, खोडकर किंवा पर्यटकांना त्रास देतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. माकडांच्या अनोख्या हालचाली आणि गंमतीदार कृती पाहून नेटकऱ्यांचेही चांगलेच मनोरंजन होते. त्यामुळे असे व्हिडीओ काही वेळातच मोठ्या प्रमाणावर शेअर केले जातात.
माकड हा अत्यंत हुशार आणि माणसांच्या हालचालींचे अनुकरण करणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे माकडांचे मजेशीर, खोडकर किंवा वेगवेगळ्या हालचाली करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यांच्या अनोख्या कृती पाहून नेटकऱ्यांचेही लक्ष वेधले जाते आणि काही व्हिडीओंवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया पाहायला मिळतात.
आता असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी फोटो काढण्यासाठी उभी असताना अचानक एक माकड तिच्याजवळ येते. काही क्षणांतच माकड तिच्या डोळ्यांवर असलेला चष्मा काढून घेते. माकडाच्या या अनपेक्षित कृतीमुळे तरुणीची चांगलीच तारांबळ उडाल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. या मजेशीर प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @bhaargavipया अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “म्हणून मला माकडाची भिती वाटते” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “अरे बापरे” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “मजेशीर क्षण”
