पाकिस्तानातील कराची विद्यापीठात झालेल्या बॉम्बस्फोटात (Blast near Karachi University) तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कराची शहरात असलेल्या या विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. कराची विद्यापीठाच्या कन्फ्युशियस इमारतीजवळ हा स्फोट झाला. सिंध पोलीस प्रमुखांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. प्राथमिक तपासात बुरखा घातलेल्या महिलेने ही घटना घडवून आणल्याचेही त्यांनी सांगितले. दुपारी अडीचच्या सुमारास व्हॅनजवळ आत्मघाती स्फोट झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. पाकिस्तानी टीव्ही चॅनल जिओ न्यूजनुसार, बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन चिनी नागरिकांचाही समावेश आहे. हे शिक्षक व्हॅनमधून कन्फ्युशियस विभागात जात असताना हा स्फोट झाला.

पाकिस्तानातील कराची विद्यापीठावर झालेला हल्ला एका बुरखा घातलेल्या महिलेने घडवून आणला जी चिनी नागरिकांच्या बसची वाट पाहत होती आणि ती जवळ येताच तिने स्वत:ला उडवले. बलुचिस्तानच्या तुर्बतमधील नियाझार आबाद येथील ३० वर्षीय शरी बलोचने प्राणीशास्त्रात एमएससी पूर्ण केले होते. तिचा नवराही उच्चशिक्षित आहे तो डॉक्टर आहे. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या अफगाणिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) जारी केलेल्या निवेदनानुसार, बलोच ही एम फिलचे शिक्षण घेत होती आणि ती विज्ञानाचा शिक्षकही होती.

Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
loksatta kutuhal french computer scientist dr yann andre lecun deep learning and the future of ai zws 70
कुतूहल : यान आंद्रे लकून : डीप लर्निंगचे गॉडफादर
Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ
Saima ubaid First female powerlifter from Kashmir
सायमा ओबेद… कश्मिरमधील पहिली महिला पॉवरलिफ्टर

(हे ही वाचा: कराची विद्यापीठामध्ये आत्मघातकी बॉम्ब हल्ला करणाऱ्या महिलेच्या पतीचं ट्विट viral, “तुझ्या निःस्वार्थी कृत्याने मला…”)

महिलेच्या पतीची पोस्ट व्हायरल

शरी बलोच नावाच्या महिलेच्या पतीने आपल्या पत्नीच्या ‘निःस्वार्थ कृत्याचा’ अभिमान व्यक्त करणारे ट्विट (Suicide Bomber husband tweet) पोस्ट केले आहे, असा दावा अफगाणिस्तानचे पत्रकार बशीर अहमद गवाख यांनी केला आहे. “शरी जान, तुझ्या निःस्वार्थी कृत्याने मला अवाक केले आहे पण आज मी अभिमानानेही भारावून जात आहे. महरोच आणि मीर हसन हे खूप चांगले व्यक्ती बनतील जे विचार करतील की त्यांची आई किती महान स्त्री होती. तू आमच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनून राहशील.” कराची आत्मघाती हल्लेखोराचा पती हबितान बशीर बलोच याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.