scorecardresearch

मुस्लिम वृद्धाने मधुर आवाजात गायले संस्कृत श्लोक; Viral Video पाहून तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध

हा व्हिडीओ गुजरातमधील भावनगरचा आहे. ज्यामध्ये एक मुस्लिम वृद्ध प्रथम सुरेल आवाजात संस्कृत श्लोक गातात, नंतर देशभक्तीपर गाणी गातात.

मुस्लिम वृद्धाने मधुर आवाजात गायले संस्कृत श्लोक; Viral Video पाहून तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध
photo(twitter/naqvimukhtar)

तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी एका मौलानाने ‘महाभारत’ चे शीर्षक गीत ‘अथ श्री महाभारत कथा’ गाऊन सोशल मिडीया वापरकर्त्यांना मंत्रमुग्ध केले होते. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुस्लिम वृद्ध संस्कृत श्लोक ‘गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुरदेवो महेश्वर:’ आपल्या मधुर आवाजात गाताना दिसत आहेत. यानंतर ते देशभक्तीपर गीतेही गात आहेत. एका मुस्लीम वृद्धाने अतिशय मधुर आवाजात गायलेला श्लोक ऐकून सोशल मीडियावरील वापरकर्ते मंत्रमुग्ध झाले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान चित्रित करण्यात आल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुस्लिम वृद्ध अतिशय मधुर आवाजात आपल्या सादरीकरणाची सुरुवात संस्कृत श्लोकाने करतात. त्यानंतर ते श्रोत्यांना देशभक्तीपर गीते देखील ऐकवतात. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुस्लिम वृद्ध व्यक्ती अतिशय गोड आवाजात देशभक्तीपर गीत गात आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच या मुस्लीम वृद्धाने गायलेली गीते ऐकून नेटकरी मंत्रमुग्ध झाले आहेत. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहून नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

( हे ही वाचा: ‘माणसाचं वय सांगते’ हे अद्भुत पेंटिंग; विश्वास बसत नसेल तर हा Viral Video एकदा पहाच)

येथे मुस्लिम वृद्धाचा व्हिडीओ पहा

( हे ही वाचा: Optical Illusion: लाल ठिपके जोडल्या नंतर तुम्हाला इंग्रजी अक्षर दिसले का? फक्त १% लोकांना देता आलं योग्य उत्तर)

हा अतिशय सुंदर व्हिडीओ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या हिंदुस्थानच्या या जोशला सलाम.’ अवघ्या २मिनिट २० सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत ३ लाख २२ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर १६ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याचबरोबर लोक हा व्हिडीओ प्रचंड शेअर देखील करत आहेत. याशिवाय अनेकांनी यावर वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या