Viral video: सोशल मीडियावर सतत काही न काही व्हायरल होत असते. तिथे आपल्याला अनेक डान्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. काही व्हायरल व्हिडिओ पाहून पहातच राहावे वाटते तर काही व्हिडिओ पाहून अक्षरशा: कौतुक करावेसे वाटते, सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात व्हिडिओत एका आजोबांनी धमाकेदार डान्स केलेला आहे. या व्हिडीओमध्ये आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय, याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका कार्यक्रमात डीजे लागला आहे आणि यावेळी नाच रे मोरा आंब्याच्या वनात या गाण्यावर आजोबांनी धमाकेदार डान्स केला आहे. आजोबांचा डान्स पाहून प्रत्येकजण कॅमेऱ्यात डान्स कैद करताना दिसत आहेत.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे आजोबा कशाचीही तमा न बाळगता अक्षरश: डीजेच्या बेसवर ऊभं राहून नाचत आहेत.आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे अनुभव घेतले असणारी वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, सगळे लोक खाली बसून आजोबांचा डान्स पाहत आहेत. आजोबांनी डान्स करायला सुरुवात करताच बघ्यांनी या आजोबांना जोरदार दाद दिली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आजोबांचं कौतुक कराल.तसेच तुम्हालाही आजोबांचे एक्सप्रेशन बघून हसू आवरणार नाही.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर dada_kondke_fan_club_ या अकाऊंटवरुन अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो काही क्षणांत व्हायरल झालाय. लोक या व्हिडीओला आवडीने पाहत असून लाईक आणि शेअर करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की, आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत. या वयातदेखील आजोबांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर शेवटपर्यंत जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे.