Premium

“नाच रे मोरा, आंब्याच्या वनात..” गाण्यावर आजोबांनी केला भन्नाट डान्स, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

या व्हिडीओमध्ये एक आजोबा “नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच” या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

dance video
आजोबांनी केला भन्नाट डान्स

Viral Video : सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण वेगवेगळ्या गाण्यावर रिल्स बनवताना दिसतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरुन हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा “नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच” या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हे आजोबा घरीच एका मराठी गाण्यावर डान्स करत आहे. “नाच रे मोरा, आंब्याच्या वनात..” या लोकप्रिय गाण्यावर आजोबा तुफान डान्स करताना व्हिडीओत दिसत आहे. त्यांचे हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओतून तुम्हाला दिसून येईल की जीवनात प्रत्येक क्षणाचा आनंद घेताना वयाचं बंधन नसते. हे आजोबा सुद्धा डान्सचा भरपूर आनंद घेताना दिसत आहे.

हेही वाचा : डॉक्टरांचे कौतुक करावे तितके कमी, मजा-मस्तीमध्ये टोचले इंजेक्शन; चिमुकल्याला कळलेसुद्धा नाही, व्हिडीओ एकदा पाहाच

manishshetye786 या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “काका एकच मन आहे, किती वेळा जिंकणार..” तर एका युजरने लिहिलेय, “मी तुमचा खूप मोठा चाहता आहे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A old man dance video on nach re mora marathi song funny video goes viral ndj

First published on: 22-09-2023 at 12:07 IST
Next Story
Video : गणपती बाप्पाभोवती केली चक्क व्यायाम करणाऱ्या उंदीरांची आरास; देखाव्यातून दिला सामाजिक संदेश